लातूर : प्रतिनिधी
जळगाव, पुणे येथे फाउंडेशनच्या वतीने मनोबल व संजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कार्य करणा-या यजुर्वेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनला ‘आरसीसी’ शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सरांनी सामाजिक बांधिलकी जपत १ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ‘आरसीसी’ या शैक्षणिक संकुलातून घडणारे गुणवंत विद्यार्थी व उज्ज्वल निकालामुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहचविणा-या प्रा. शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातदेखील सातत्याने सहभागी होत असतात.
नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन वंचित, गरिबांसाठी शक्य ती मदत करणा-या प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी दिव्यांग, वंचित मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना समाजात मान मिळावा यासाठी कार्य करणा-या जळगाव येथील प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनला १ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. प्रत्येक विद्यार्थी घडवा त्याची स्वप्न पूर्ण व्हवीत यासाठी मोटेगावकर सर सतत प्रयत्नशील असतात आणि म्हणूनच दीपस्तंभ संस्थेमधील मुलांच्या शैक्षणिक उज्ज्वल वाटचालीसाठी प्रा. मोटेगावकर सरांनी एक लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांना प्रा. शिवराज मोटेगावकर सर, सौ. मीनल मोटेगावकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. प्रा. मोटेगावकर सरांनी केलेल्या मदतीमुळे दीपस्तंभ फाउंडेशनमधील मुलांसाठी मोठा आधार मिळणार आहे.