21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरइंद्रठाणा येथे शनिवारी कव्वालीचा मुकाबला

इंद्रठाणा येथे शनिवारी कव्वालीचा मुकाबला

एकमत ऑनलाईन

रेणापूर : हजरत बाबा फरीद शकरगंज यांच्या ऊर्स यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर शनिवारी दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे.
हा यात्रा महोत्सव हजरत सय्यद सादिक अलीशाह हुसैन व हजरत अली शाह दुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरुवारी दि. ४ रोजी गुसूल मुबारक, शुक्रवारी दि. ५ रोजी संदल मुबारक , शनिवार दि. ६ रोजी रात्री ९ वा. अजÞीजÞ नसीर उस्मानी (बिदर) आणि ईरम चिस्ती ( औरंगाबाद) यांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे.

तेव्हा तालुक्यातील व परिसरातील हिदु- मुस्लिम भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीण विधानसभा अल्पसंख्याक कॉग्रेस अध्यक्ष,लातूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक आशादुल्ला बाशुमियाँ सय्यद , उपाध्यक्ष अन्वर सय्यद हाजी उमर, उर्स संदल कमिटी उपाध्यक्ष सय्यद महेमुद्दीन आजÞम अकबर सय्यद, जमील सय्यद, मुस्तफा सय्यद, रसूल सय्यद, अलीम सय्यद,असलम सय्यद, पिरपाशा सय्यद, समीर सय्यद, हनीफ सय्यद, मूर्तुजा सय्यद, इरफान सय्यद, सोहेल सय्यद, फारुख सय्यद, अजÞहर सय्यद, अहेमद सय्यद, सर्फराजÞ सय्यद, इम्रान सय्यद, सादेक सय्यद, जाकेर सय्यद, इब्राहीम सय्यद, अ.रहीम सय्यद, रसूलखाँ पठाण, आसीफ सय्यद, निसार सय्यद,शाफीक सय्यद, आमीन सय्यद, आसिफ सय्यद, आयुब सय्यद, युसूफ सय्यद, अफरोज पटवारी यांच्यासह केजीएन ग्रुपचे अध्यक्ष इब्राहीम सय्यद व केजीएन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या