26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरचिंतनाला मूल्यात्मकतेची जोड असल्यावर दर्जेदार साहित्य निर्माण होते - कौतिकराव पाटील

चिंतनाला मूल्यात्मकतेची जोड असल्यावर दर्जेदार साहित्य निर्माण होते – कौतिकराव पाटील

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
साहित्याला तत्वज्ञानाचे अधिष्ठान आवश्यक आहे तसेच चिंतनाला मूल्यात्मकतेची जोड असल्यावर दर्जेदार साहित्य निर्माण होते, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. शब्दपंढरी प्रतिष्ठान लातूरच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले साहित्यिक फ. म. शहाजिंदे यांनी साहित्यिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे तसेच शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर साहित्याचे संस्कार झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. साहित्य हा मानवाचा तिसरा डोळा असून साहित्यातून सत्याचे दर्शन झाले पाहिजे असे डॉ. नागोराव कुंभार म्हणाले. आपले साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्याचे काम साहित्यिकाने केले पाहिजे अशी अपेक्षा धर्मराज हल्लाळे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी वृक्षचळवळ, सामाजिक, शैक्षणिक, कला व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे सुपर्ण जगताप, बालाजी जाधव, सतीश हानेगावे, शिवाजी हांडे, सुनंदा जगताप, सोनू डगवाले, विजय औंढे, विशाल अंधारे, उर्वी यादव, दिलीप कदम, राजकुमार पाटील, दिलीप लोभे, ज्योती कदम, वैशाली दुरूगकर व गीता राघो यांचा शब्दपंढरी प्रतिष्ठानतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लातूर व परिसरातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिराज माने यांनी तर सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या