लातूर : प्रतिनिधी
शहरातील नामांकित आर. एन. मोटेगावकर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष देशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या ‘आरसीसी’ शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर होते. उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्था सचिव मीनल मोटेगावकर, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदानाचे संचालक तुकाराम पाटील, अॅड. दासराव शिरुरे, संगीता शिरुरे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वर्ग व धरती या थीमवर आधारित विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून उपस्थितांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यालयातील विद्यार्थी, तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. याबरोबरच असंख्य पालकांची सुद्धा उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.