36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : बुधवारचा दिवस लातूर जिल्ह्यातील पावसासाठी महत्वाचा ठरला़ यंदाच्या पावसाळ्यात सर्वात मोठा पाऊस या दिवशी पडला़ सरासरी २९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस अहमदपूर तर सर्वात कमी २१ मिलिमीटर पाऊस देवणी तालुक्यात झाला आहे.

जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर, जळकोट, शिरुर अनंतपाळ, चाकुर, रेणापूर या तालुक्यांत २० मिलिमीटरच्या पुढेच पाऊस पडला़ हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी चांगला आधार ठरला असून या पावसामुळे भूजलाच्या पातळीत चांगलीच वाढ होण्याची आशा शेतक-यांना आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी २७.६८ दलघमी इतकी झाली आहे़ या प्रकल्पात आजघडीला एकुण पाणीसाठा १२.३५ टक्के आहे़ प्रकल्पातील मृत पाणीसाठा ४७.१३ दलघमी इतका आहे़ ब-याच वर्षांनंतर यंदा लातूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत आहे.

जूनप्रमाणेच जुलै महिन्यात ही पावसाने सातत्य ठेवले आहे़ कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे़ गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे़ मंगळवार दि़ १४ जूलै रोजी ८ मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर दुसºया दिवशी दि़ १५ जूलै रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ हवामान होते़ थंड वारे सुटल्याने दिवसभरात केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता होती़ सायंकाळी पावसाला सूरुवात झाली़ जिल्ह्या सर्वदूर पाऊस पडला़ बुधवारच्या पावसानंतर जिल्ह्यात ३१२ मिलिमीटर पाऊस झाला़ अपेक्षीत पावसाच्या १२८ तर वार्षिक सरासरीच्या ३९ टक्के पाऊस झाला़

मांजरा प्रकल्पात सात महिने पुरेल इतके पाणी
लातूर शहराला पाणीपुरठा होणाºया मांजरा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा दि़ २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला होता़ तेव्हापासून आजतागायत या प्रकल्पातील मृतसाठ्यातूनच लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे़ उपलब्ध पाण्याचे नियोजन केले गेल्याने सध्याही शहराला दहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा केला जातो आहे़ यंदाच्या पावसाळ्याने चांगली साथ दिली आहे़ मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने आजघडीला मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी २७.७० दलघमी इतकी झाली आहे़ गतवर्षी याच तारखेपर्यंत या प्रकल्पातील पाणीपातळी ८ दलघमी इतकी होती़ यंदा या प्रकल्पात ब-यापैकी पाणीपातळी वाढत असल्याने उपलब्ध पाणी येत्या जानेवारी-फेबु्रवारीपर्यंत पुरेल, अशी माहिती महानरगपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विजय चोळखणे यांनी दिली.

गतवर्षीच्या जूनपेक्षा यंदाच्या जुनमध्ये पाऊस जास्त
गेल्या वर्षी जुन महिन्यात लातूर जिल्ह्यात कवेळ ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती़ यंदाच्या जूनमध्ये २१२ मिलिमीटर पाऊस पडला आहे़ गतवर्षीच्या जूनमधील पावसाच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये १२८ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे.

Read More  गुळखेड्यात कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या