24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरपिकांसाठी पावसाची नितांत गरज

पिकांसाठी पावसाची नितांत गरज

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके कांही ठिकाणी फुलो-यात आहेत. तर कांही ठिकाणी शेंगा लागत आहेत. या पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे. शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

लातूर जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार ४० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. जिल्ह्यात कमी-जास्त स्वारूपात पाऊस पडत आहे. जिल्हयात सरासरी ७९१.६० मिलीमिटर पाऊस पडतो. पावसाची सरासरी पाहता आजपर्यंत ५३२.८ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या आधारवर ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ६८ हजार ८१७ हेक्टरवर, मूगाचा ६ हजार ७१ हेक्टरवर, उडीदाचा ४ हजार १० हेक्टरवर, साळीचा १७२ हेक्टरवर, ज्वारीचा ६ हजार ३८७ हेक्टरवर, १६५ हेक्टरवर बाजरी, मकाचा २ हजार ४८६ हेक्टरवर, तीळ ३०४ हेक्टरवर, भुईमूग २९८ हेक्टरवर, कारळ १८९ हेक्टरवर, तर १५ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. तसेच ६ हजार १९१ हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतक-यांनी ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत. सोयाबीन, मुग, उडीद आदी पिके सध्या फुलो-यात, तर कांही ठिकाणी शेंगा लागण्याच्या आवस्थेत आहेत. शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी सध्या पावसाची नितांत गरज आहे. गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांमध्ये चिंता वाढली आहे. कांही ठिकाणी शेत विहिरीचे पाणी देवून पिकांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.नैसर्गीक पावसांच्या पिकांसाठी नितांत गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या