23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरविश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय

विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. दि. २४ ते २६ जुलै या तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दि. २७ जुलै रोजी पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक पावसाचा मोठा सडाका आला. त्यानंतर काही काळ पाऊस थांबला आणि नंतर जोरदार पाऊस सुरु झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.

यंदा पाऊस लवकर आणि भरपूर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानूसार लातूर जिल्ह्यातील शेतक-यांनी एप्रिल-मे मधील कडक उन्ह अंगावर घेत खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेत-शिवारं तयार करुन ठेवली होती. मृगनक्षत्राच्या प्रारंभी ब-यापैकी पाऊस पडला. त्यामुळे काही शेतक-यांनी पेरण्या केल्या. किमान १०० मी. मी. पाऊस पडल्याशिवाय शेतक-यांनी पेरण्या करु नये, असे आवाहन मध्यंतरी कृषी विभागाने केल्यामुळे पेरण्या रखडल्या आणि पाऊसही रखडला. १०० मी. मी. पाऊसाच्या प्रतिक्षेत पेरण्या राहून गेल्या. मृग नक्षत्राने दिलासा देण्याऐवजी शेतक-यांची निराशा केली. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्रावर होत्या. आर्द्रामध्ये तरी पाऊस चांगला पडेल, पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतक-यांना होती आणि झालेही तसेच. पाऊसाने चांगली साथ दिली. जिल् तील पेरण्या भराभरा उरकल्या.

गेल्या आठवड्यात दि. २१ जुलैपासून लातूर जिल्ह्यात पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. २१ व २२ जुलै असे सलग दोन दिवस लिल्ह्यात संततधार होती. त्यामुळे सूर्यदर्शनही झाले नाही. संततधारेने सर्वत्र पाणीचा पाणी केले. दि. २३ जुलै रोजी तर पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूरच्या पुर्वेकडील बाभळगाव, धनेगाव, बोरी, सलगरा यासह जवळपास ५० गावांमध्ये ढगफुटी झाली. सर्वच्या सर्व गावांतील पिके पाण्याखाली गेली. शेतीचे तळे झाले. शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नूकसान झाले. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतक-यांनी शेतातील गवत काढण्यासोबतच फवारणीची कामे करुन घेतली. मंगळवारी सायंकाळी पुन्हा पाऊस सक्रीय झाला. सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत होता.

जिल्ह्यात आतापर्यंत १६२.१ मी. मी. पाऊस
लातूर जिल्ह्यात या मोसमात आतापर्यंत १६२.१ मी. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. लातूर- १५५४ मी. मी., औसा-१७३.१, अहमदपूर-१३३.४, निलंगा-१७०.०, उदगीर-१५१.४, चाकुर-१३१.१, रेणापूर-१५९.०, देवणी-९०.७, शिरुर अनंतपाळ-१५१.९ तर जळकोट तालुक्यात १७०.७ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

अब की बार…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या