लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात आवघ्या दिड महिन्यात जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. पडणा-या पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून जिल्ह्यातील १ हजार ६११ शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती, आंगवाडीच्या इमारतीवरच्या पावसाचे पाणी सार्वजनिक स्रोतांमध्ये सोडून ते पुर्नजीवीत करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील शासकीय इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती, आंगणवाडीच्या इमारतीवरच्या पावसाचे पाणी जुने बोअर, विहिरी, बारव मध्ये सोडून जलपुनर्भरण करण्यात येणार आहे. सदर कामे ग्रामपंचायतींना १५ वित्त आयोगातून करता येणार आहेत. १ हजार ६११ पैकी आज पर्यंत १९२ ठिकाणी रेन वॉटर हर्वेस्टिंग करण्यात आले आहे. उर्वरीत कामे मार्च अखेर पर्यंत करण्याच्या सूचना आहेत. ७६ सार्वजनिक स्रोतांचेही जल पुनर्भरण करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील जुन्या ७५ तलावांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत ६०+६० मिटरचे ८५ तलाव करण्यात येणार आसून आज पर्यंत ११ पूर्ण झाले आहेत. तसेच गावालगतच्या जुन्या विहिरी, बारव यांचे पुनरूजिवन करण्यात येणार आहे.
शहरालगतच्या ग्रीन बेल्ट मध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.