21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरपर्जन्यमान चांगले होऊन भरघोस शेती उत्पादन मिळावे

पर्जन्यमान चांगले होऊन भरघोस शेती उत्पादन मिळावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २२ जुलै रोजी दुपारी लातूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक भंडारा उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी पर्जन्यमान चांगले होऊन भरगोस शेती उत्पादन मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कायम शेतकरी, कष्टक-यांचे हित जपले आहे. भविष्यकाळातही तीच परंपरा पुढेच चालू राहील. लातूरच्या बाजारपेठेचा लौकिक आणखीन वाढत राहावा यासाठी येथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की आजचा भंडारा कष्टक-यांसाठी नैवेद्य म्हणून दिला जातो या बाजारपेठेची ठेवी १०० कोटी पर्यंत गेली आहे. या ठेवीकडे अनेक लोकांचे डोळे लागले आहेत ज्या संस्थेत चांगले काम झाले आहे या बाजारपेठेला खूप पुढे घेऊन जायचे आहे येथे रस्ते नाल्या वीज शौचालय करायचे आहे मूलभूत गरजा या ठिकाणी विकसित झाल्या पाहिजेत तिथल्या पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव तयार करा अशी सूचना त्यांनी प्रशासक दुधाटे यांना केली. मतदार नेहमी चांगले काम करणा-या लोकांच्या पाठीशी असतात नव्या दिशेने या बाजारपेठा पुढे घेऊन आपणाला जायचे आहे. पाऊस सध्या चांगला पडत आहे नद्या भरून वाहत आहेत. जवळपास ५०% अधिक पर्जन्य झाले आहे. सार्वजनिक सत्यनारायण भंडारा उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना सुखी आनंदी जीवन लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे सांगून त्यांनी उपस्थित नागरिकांना भंडारा उत्सवाचा प्रसाद वाटप केला.

यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, माजी उपसभापती मनोज पाटील, माजी महापौर विक्रांत गोजमगुडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, रमेश सूर्यवंशी, सुधीर गोजमगुंडे, बालाप्रसाद बीदादा, संजय शिंदे, हर्षवर्धन सवई, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, युनूस मोमीन, संजय शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दुधाटे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या