24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरपावसामुळे ओढ्यास पूर, शेतीचे नुकसान

पावसामुळे ओढ्यास पूर, शेतीचे नुकसान

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील उजेड परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीने उजेड गावालगतच्या बेवनाळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे ओढ्याकाठच्या शेतीचे नुकसान झाले असून या पुरामुळे खरिपाच्या कोवळ्या पिकांसह शेतजमीन वाहून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे जिकीरीचे झाले असून कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतक-यांच्या मागील दुष्टचक्र काही संपत नसून अनेक अडचणीचा सामना करताना खरिप पेरणी केली पण या पुरामुळे पिके व शेत जमीन वाहून गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

या अस्मानी संकटाने शेतकरीचिंताग्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचण असतानाही जुळवाजुळव करून खरिपाची पेरणी केली. कोवळी पिके दिसू लागली असताना या पावसाळ्यात प्रथमच सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने ओढ्याला पुर येऊन शेतजमीन व कोवळी पिके वाहून गेली आहेत. या ओढ्या काठच्या शेतीचे त्वरीत पंचनामे करावेत व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ओढ्या काठच्या शेतक-यांतून केली जात आहे.

अजनी रस्त्यावरील पाईप पुलाची उंची वाढवा
शिरूर अनंतपाळ शहरापासून अजनीकडे जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी केलेल्या कमी उंचीच्या पाईप पुलाला कचरा अडकून पावसाचे पाणी शेतात साठल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या पाईप पुलाची उंची वाढवावी अशी मागणी शिरूर अनंतपाळ येथील शेतक-यांतून केली जात आहे

लातूर शहरातील ३५० पथविक्रेत्यांना ३५ लाखांचे कर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या