35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर शेतक-यांच्या मदतीसाठी अधिवेशनात आवाज उठवा

शेतक-यांच्या मदतीसाठी अधिवेशनात आवाज उठवा

विरोधी पक्षनेते फडणवीस यांना आमदार पवार यांची विनंती

एकमत ऑनलाईन

औसा : पीक नुकसानीची पाहणी, आढावा बैठक, बैठकीनंतर जिल्हाधिका-यांकडे पीक नुकसानीची मागणी व तातडीने मुंबईकडे रवाना होऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतक-यांच्या व्यथा मांडल्या तसेच अधिवेशनात शेतक-यांच्या मदतीसाठी आवाज उठवावा, अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

औसा मतदारसंघातील गावात जाऊन खरिप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग या पीकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करित आमदार अभिमन्यू पवार यांनी त्याच दिवशी औसा येथे आढावा बैठकीतून कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पीक परिस्थितीचा आढाव घेत याच दिवशी सोयाबीन नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तसेच पिकविमा नुकसानीच्या नियमानुसार २५ टक्के आगाऊ देणे बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी करीत तातडीने मुंबई गाठत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जिल्ह्यास मराठवाड्यातील सोयाबीन उडीद व मूग या पीकांचे म्हणजे संपूर्ण खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतक-यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.

पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे असल्याने माझ्यासारख्या नव्या आमदारास बोलण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हा विषय सभागृहात मांडून सरकारला मदत द्यायला भाग पाडावे अशी विनंती आमदार पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

३० ऑगस्ट रोजी लातूर येथील मराठवाडा मेट्रो कोच कारखाना,भेटीचा संपूर्ण वृत्तांत फडणवीस यांच्यापुढे मांडला. दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आगामी जयंतीपासून या कारखान्यातून प्रत्यक्ष निर्मीती सुरू करण्याच्या विनंतीला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तत्वता मान्यता दिल्याची माहितीही आमदार पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

जळकोट तालुक्यातील पिके कोमेजू लागली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या