लातूर : उदगीर जवळील तोंडार पाटी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित बहिण, भाऊ उपचार घेत आहेत. सोमवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला गेला. त्यानिमित्ताने कोविड सेंटरमध्येच बहिणीने भावाला राखी बांधली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे -हदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. या संस्कृतीचाच एक भाग म्हणजे रक्षाबंधनाचा सण होय.
भाऊ-बहिणीच नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. परंतू, यंदा हा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलानाही बहिणीने आपल्या लाडक्या भावाला प्रेमाने राखी बांधून कोरोनाशी लढण्याचा संकल्प केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. दिवाळी असो की ईद, सण असो की उत्सव पोलीस बंधु-भगिनी आपल्या कर्तव्यावर असतातच. सोमवारी रक्षाबंधनाचा सण असला तरी लातूर शहरातील गांधी चौकात पोलीस बंधु-भगिनी कर्तव्यावर होते. पोलीस भगिनींनी आपल्या पोलीस भावांना राख्या बांधल्या. कर्तव्यात कसुर न करता चौकातच रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. घराघरात बहिणींनी आपल्या भावाला राख्या बांधल्या.
Read More हुवेई कंपनीला ५-जीचे कंत्राट देऊ नका