रेणापूर : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून उद्योजक बनविण्यासाठी रखुमाई निधी लिमिटेडची मदत होईल,असे प्रतिपादन आमदार धिरज विलासराव विलासराव देशमुख यांनी केले. जगदंबा उद्योग समुहाच्या पुढाकारातून लातूर येथील गुळ मार्केट परिसरात सुरू करण्यात आलेल्या रखुमाई निधी लिमिटेडच्या उद्घाटन ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार त्र्यंबक भिसे तर पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कर पेरे पाटील, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. प्रमोद जाधव,रेणा कारखान्याचे संचालक लालासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव गोंिवदपूरकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. किरण जाधव, शेकापचे अॅड.उदय गवारे, मराठा उद्योजक व विकास संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव तळेकर, नगरसेविका रेहान बासले, उद्योजक दर्शन जैन, राष्ट्रवादीचे विधानसभा युवा अध्यक्ष राहुल तळेकर,शहाजीराव उबाळे, रखुमाई निधी लिमिटेडचे चेअरमन महादेव उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार देशमुख म्हणाले की,उबाळे परिवाराने चिकाटीने विविध उद्योग व्यवसाय उभारलेले आहेत. ग्रामीण भागातून येत या व्यवसायांमध्ये स्थैर्य व विश्वास निर्माण केला आहे. स्वत: सोबतच ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा, ते तरुणही उद्योजक बनावेत यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या उद्देशानेच रखुमाई निधी लिमिटेडची सुरुवात करण्यात आली आहे. अनेकदा राष्ट्रीयीकृत व खाजगी बँका कर्ज पुरवठा करीत नाहीत.अशावेळी सर्वसामान्य व गोरगरीब तरुणांना व्यवसाय उभारताना अडचणी येतात.ज्या तरुणांना बँका अर्थपुरवठा करत नाहीत त्यांच्यासाठी रखुमाई निधी लिमिटेडने अर्थपुरवठा करण्याचे धोरण आखले आहे.
यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लाभ होणार असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.प्रारंभी उबाळे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.भास्कर पेरे पाटील,त्र्यबक भिसे मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविकात चेअरमन उबाळे म्हणाले, की, एक एक स्वप्न पाहत गेलो ते स्वप्न पूर्ण होत गेले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई -वडिलांचे आशिर्वाद व सर्वांच्या सहकार्यमुळे पूर्ण करता आले. सुत्रसंचलन नवनाथ झुट्टे यांनी तर आभार जिल्हा मजुर फेडरेशन संचालक अशादुल्ला सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन व्यंकटराव उबाळे, सचिव श्रीकृष्ण जाधव, संचालक अरुणकुमार झाडपिडे,अश्विन वाच्छाणी, सौ. पार्वती उबाळे, सौ.शारदा उबाळे यांच्यासह परिवारातील सदस्य, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.