32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरग्रामीण भागातील रणरागिनी उपसरपंच पटणे

ग्रामीण भागातील रणरागिनी उपसरपंच पटणे

एकमत ऑनलाईन

चाकूर : ‘ चूल आणि मुल’ यातच तिचे संपूर्ण आयुष्य नष्ट होते, अशा या जगण्याला कांही महिलांनी विरोध केला. त्यांना हे चित्र बदलले पाहीजे, असे वाटू लागले. त्या समाजकारण ,राजकारण,सर्वच क्षेत्रात ताठ मानेने आम्ही अबला नसून सबला आहोत, असे जीवन जगत आहेत. तालुक्यातील आदर्श गाव अलगरवाडी येथील उपसरपंच तथा बचत गटाच्या सी.आर.पी. म्हणून कार्यरत असलेल्या सौ. नुजाताई संगमेश्वर पटणे यांचा जीवन प्रवास असाच संघर्षमय व आदर्श आहे.

अनुजाताईचे माहेर देवर्जन ता.उदगीर होय. त्यांचे शक्षिण १० वी पर्यंतच झालेले, त्यांचे पती संगमेश्वर पटणे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी आपल्या पत्नीला सामाजिक कार्य करण्यास परवानगी दिली. अनुजाताई या स्वत: हुशार असल्याने त्यांचा सहवास ‘उमेद’ या सेवाभावी संस्थेशी आला. त्यांनी उमेदमध्ये बचत गटाचे प्रशिक्षण घेत असताना तिथे अनेक व्यासंगी लोकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि येथूनच त्यांनी माहिला बचत गटाच्या कार्यास प्रारंभ केला. अलगरवाडी येथील महिलाना संघटीत करून, त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. सुरवातीला कांही महिलांनी त्यांना विरोध केला. नंतर बचतीचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली. हळूहळू महिला त्यांच्याकडे आकर्षित झाल्या. त्यांनी सुरुवातीला ‘महात्मा बसवेश्वर स्वंयसाहय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या त्या स्वत: कोषाध्यक्ष आहेत.

या गटातील महिलांना बचतीची सवय लागली. पुढे वेगवेगळी २२ बचत गट काढले. त्या सर्व बचत गटाच्या सी.आर.पी. म्हणून उत्कृष्टपणे कार्य करतात . त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अलगरवाडी येथे ‘मिरची कांडप ‘,पापड उद्योग, खारूडया व कोरोनासाठी मास्क ,तयार करणे असे उद्योग सुरू केले.अनुजाताई सध्या आदर्श गाव अलगरवाडीच्या उपसरपंच आहेत. गावात कोणताही कार्यक्रम असला की त्या सर्व महिलांना घेऊन कार्यक्रमाला येतात. त्यांना आदर्श सरपंच गोंिवदराव माकणे ग्रामसेवक प्रशांत राजे, तालूका व्यवस्थापक माधव शेळके, बी.एम.एम. ंिरकू कोंम्पले, व माणदेशी फौऊण्डेशनच्या मार्गदर्शनामुळेच मी हे सर्व करू शकले असे त्या आवर्जून सांगतात .

सध्या गावात २२ महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळ जवळ २२८ महिलाना संघटित, स्वाभिमानी, सबला आणि निर्भर बनविण्याचे कार्य त्या करीत आहेत.  कोरोना सारख्या महामारीच्या आजारावर मात करण्यासाठी बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन जिच्या हाती आरोग्याची दोरी , ती जगा उध्दारी’ या नवीन सूत्रानुसार त्यांनी प्रत्येक घरोघर डेटॉल साबन , मास्क वाटप केले आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून अलगरवाडी येथील संपूर्ण होलार समाज बांधवाच्या वतीने सरपंच गोंिवदराव माकणे व उपसरपंच सौ. अनुजाताई व सर्व सदस्याचा प्रा. वैजनाथ सुरनर व सौ. कुसुम सुरनर यांनी सत्कार केला.

पतीच्या निधनानंतर सांभाळले रिक्षाचे स्टेअरींग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या