22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरअल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व दंड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व दंड

एकमत ऑनलाईन

लातूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालय ( पोक्सो) न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयात झाली. न्यायाधिशांनी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पिडीत बालिका घरी एकटी असल्याचे पाहुन दि. २८ ऑगस्ट २०१५ रोजी आरोपी दिगंंबर व्यंकट गौड (माळी) याने पिडीतेचे तोंड दाबून शेतातील पिकामध्ये पिडितेवर बलात्कार केला. पिडीतेच्या आईने पिडीत घरात न आढल्यामुळे शोध घेतला असता पिडीत ही शेतातील पिकात विवस्त्र बेशुध्द आवस्थेत आढळुन आली. पिडीतेची आई-वडील व शेतातील दुस-या सालगड्याने पिडीतेला उपचारासाठी खरोळा ता. रेणापुर येथील दवाखान्यात नेले. परंतु तेथील डॉक्टरांंनी पिडीतेला रेणापुर येथील दवाखान्यात उपचाराकामी पाठविले. पिडीतेला उपचारानंतर शुध्द आली असता पोलीस स्टेशन रेणापूर यांनी तिचा जबाब नोंदविला. पिडीतेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन रेणापूूर येथे आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालय ( पोक्सो) न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयात झाली. आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द करण्याकरिता एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीत तिचे आई-वडील इतर एक स्वतंत्र साक्षीदार यांचा पुरावा व इतर कागदोपत्री पुराव्यांचे अवलोकन करुन विशेष सरकारी वकील ऍड. मंंगेश एस. महिंद्रकर यांचा युक्तीवाद ग्रा धरुन न्यायालयाने आरोपी दिगंबर यास कलम ३७६ भां. द. वि व कलम ४ बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे दोषी धरुन ७ वर्ष सक्षम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात ऍड. विद्या वीर, ऍड.अंकिता धुत, ऍड. सोमेश्­वर बिराजदार यांंनी सहकार्य केले. गुन्हयाचा तपास विजय कबाडे पोलीस उपअधिक्षक चाकुर यांनी केला व कोर्टातील पैरवीचे काम स्वाती व्ही. जाधव म. पो. हे. कॉ यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या