20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home महाराष्ट्र राष्ट्रसंत डॉ. शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार

राष्ट्रसंत डॉ. शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : या शहरालगत असलेल्या भक्ती स्थळावर दि.१ सप्टेंबर रोजी मंगळवारी म्हणजे अनंतचतुर्दशी दिवशी वसुंधरा रत्न, वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेले उच्चविद्याविभूषित डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात व पूजा पठण करून लिंगायत समाजाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्युसमयी महाराजांचे वय १०४ वर्ष होते.

स्व.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात तपोनुष्ठान करीत असत. या महिन्यात दूध, फळकिंवा ज्यूस यापैकी काही तरी ते घेत असत. ते कोणालाही बोलत नसत. अनुष्ठान खूप कडक करीत असत. त्यांचे हे शेवटचे या श्रावण महिन्यातील अनुष्ठान ंिहगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ येथे करण्यात आले होते.
या नंतर ते भक्ती स्थळावर आल्यावर त्यांच्या घरातील उत्तराधिकारी कोण असावा. वीर मठ संस्थान अहमदपूर व भक्ती स्थळ अहमदपूर याठिकाणी उत्तराधिकारी कोण याविषयी वाद लागल्याची चर्चा ऐकावयास मिळाली.

शिवाचार्य महाराज अनुष्ठानाहून आल्यानंतर नांदेड येथील दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वी चार दिवस अन्नत्याग केल्याचे समजते व संपत्तीच्या वादामुळे महाराजांचा तान वाढल्याचे आणि यामुळे महाराजांची प्रकृती बिघडल्याची ही चर्चा ऐकावयास मिळाली.ते जिवंत समाधी घेणार असल्याची चर्चा वा-यासारखी पसरली आणि त्यांचे भाविक भक्ती स्थळावर जमा झाले होते. याठिकाणी त्यांच्या संपत्तीचा वाद व उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरू होती पण महाराजांनी सांगितले नेमलेले उत्तराधिकारी खरे असून ट्रस्टची निर्मिती आपण केली आहे ते चांगले काम करीत आहेत. मला व्यवस्थित जगू द्या असेही महाराज म्हणाले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नारायणा सुपर स्पेशलिटी डॉ. व्यंकटेश काब्दे -हृदय रोगतज्ञ नांदेड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच की काय पण त्यांचा अंत्यविधी फार लवकर पार पाडण्यात आल्याचे समजते. महाराजांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व लिंगायत समाजाच्या रीतिरिवाजानुसार भजन, आरती करुन करण्यात आला. भक्ती स्थळ बाहेर असंख्य भाविक भक्त जमा झाले होते पण कोणालाही अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली नाही.

जेथे अंत्यविधी करण्यात आला तेथे फक्त शंभरच्या आसपास भक्तहोते व इतर पोलिस मंडळी होती तेथे त्यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी औशा चे आ. अभीमन्यू पवार, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, जिल्हाधिकारी जी श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने ,उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेलार पाटील, नागनाथ निडवदे, मनोहर धोंडे, महाराजांचे नातेवाईक व मोजकेभक्तगण उपस्थित होते.

नांदेड येथून रात्री नऊ ते सव्वा नऊच्या आसपास अंबुलन्स आल्यानंतर भक्ती स्थळावर रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू होता. येथे महाराजांचे अंत्यदर्शन कोणालाही घेता आले नाही. महाराजांचा अंत्यविधी दुस-या दिवशी ठेवला असता तर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा येथून त्यांचे भक्तगण जमा झाले असते आणि पोलिसांना ही गर्दी आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे अंत्यविधी वेळेत आटोपण्यात आला असे समजते.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वीर मठ संस्थान अहमदपूर व हाडोळती येथील बुद्धी स्वामी मठावर उत्तराधिकारी म्हणून अभिषेक राजकुमार स्वामी इयत्ता बारावी उत्तीर्ण यांची नेमणूक केल्याचे समजते तर अहमदपूर येथील भक्ती स्थळ ट्रस्ट आहे. येथे उत्तराधिकारी म्हणून राजशेखर स्वामी यांची नेमणूक केल्याचे समजते. हे दोन्ही उत्तराधिकारी हे महाराजांचे सख्ये पुतणे आहेत. महाराजांनी सांगितले की ट्रस्ट मी नेमली असून ते चांगले काम करीत असल्याचे सांगितल्याचे समजते. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नंतर उत्तराधिकारी कोण हा फार मोठा वाद निर्माण झाला असता कारण देवस्थानची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. सध्या ट्रस्टीचे नूतन अध्यक्ष रामदास पाटील व सचिव घोटेबाई असल्याचे सांगण्यात आले.

स्व. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाजांचा अल्प परीचय
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा जन्म २५ फेब्रूवारी १९१७ रोजी झाला, सन १९२० साली त्यांना गुरूच्या सानिध्यात ठेवण्यात आले. सन १९२५ साली त्यांनी संस्कृत शिक्षण घेण्यास सुरूवात, सन १९२७ साली माहेश्वरी दिक्षा मुद्रा पद्धतीने ज्ञान अवगत, सन १९३२ साली वीरमठ संस्थानचे उत्तराधिकारी घोषीत , सन १९३८ मध्ये पट्टााभिषेक कार्यक्रम, याच वर्षी श्रावणमासाचे पहिले अनुष्ठान श्री कपिलाधार येथे संपन्न, सन १९३९ साली वाराणशी (काशी) मठाचा कार्यभार स्वीकारला, याच वर्षी दुसरे अनुष्ठान झाले, सन १९४३ मध्ये पंजाब प्रांतात राष्ट्रीय स्वयंसवेक संघ शाखेत काम, सन १९४५ मध्ये एम.बी.बी.एसची पदवी प्राप्त, १९४७ स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग तसेच दोन वेळा तुरूंगवास, १९४८ मध्ये हिमालयात योग साधना, सन १९५३ महाराष्ट्रात आगमन, सन १९५५ शिवपाठाची आवृत्ती प्रकाशन, सन १९५५ श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रेची सुरूवात, सन १९६५ परमरहस्य पारायण आवृत्ती प्रकाशन, सन १९७९ गुलबर्गा येथे वीरशैवाच्या स्वतंत्र नोंदीसाठी पंतप्रधान इंदीरा गांधीची  भेट, सन २००१ संपूर्ण महाराष्ट्रभर मन्मथ ज्योतीचे आयोजन, सन २००९ कपिलाधार पदयात्रेचा सुवर्णमहोत्सव, सन २०११ मध्ये ७५ वे तपोअनुष्ठान भक्तस्थळ अहमदपूर, सन २०१३ महाराजांच्या उपस्थितीत कपिलाधार विकासासाठी मंत्रालयात बैठक, सन फेब्रूवारी २०१६ साली १०० वा जन्मदिन भक्तस्थळ येथे साजरा. सन ३ संप्टेबर २०१७ लातूर येथे लिंगायत महामोर्चा.

लिंगायत धर्मास स्वतंत्र मान्यतेसाठी शिवाचार्य महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिला लढा

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...