लातूर : लातूर ग्रामीणमधील सर्वच नागरिकांना रेशनकार्ड मिळवून देण्याच्या उद्देशाने लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी खास मतदारसंघासाठी रेशनकार्ड नोंदणी अभियान सुरु केले असून या अभियानाचा शुभारंभ आमदार धिरज देशमुख यांनी आॅनलाईनपद्धतीने केला.
रेशनकार्ड सर्व सरकारी कामांसाठी उपयुक्त ठरणारे आहे़ लॉकडाऊनच्या काळात तर रेशन कार्डची गरज अधिकप्रमाणात वाढलेली आहे़ परंतु, रेशनकार्ड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन रेशनकार्ड, त्याचे नुतणीकरण करणे, फाटलेले किंवा जिर्ण झालेले रेशनकार्ड बदलून घेणे, गहाळ झालेले रेशनकार्ड परत काढणे, रेशनकार्डमध्ये नव्याने नावे समाविष्ट करणे, नाव कमी करणे या सर्व बाबी अशक्य ठरत आहेत़ त्यामुळे नागरिकांची ही अडचण लक्षात घेता नागरिकांना त्यांच्या गावातच नवीन रेशनकार्ड काढण्यासह उपरोक्त इतर बाबी पुर्ण करता याव्यात म्हणून आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी रेशनकार्ड नोंदणी अभियान सुरु केले आहे.
या अभियानांतर्गत गावागावातील रेशन दुकानाच्या ठिकाणी रेशनकार्डसाठी अर्ज भरुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ ज्यांना नवीन रेशनकार्ड काढावयाचे आहे, किंवा इतर दुरुस्त्या, नुतणीकरण करावयाचे आहे त्यांनी आपापल्या गावातील रेशन दूकानात जाऊन अर्ज भरावा़ सदर अर्ज भरुन घेण्यासाठी युवक कॉँग्रेसचे नागरिकांना मदत करणार आहेत़ जास्तीत जास्त नागरिकांनी रेशनकार्ड नोंदणी अभियानात सहभागी होऊन आपले रेशनकार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
Read More महाराष्ट्रात ६ हजार ७८५ नवे करोना रुग्ण, २१९ मृत्यूंची नोंद