23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरज्येष्ठा गौरींच्या आगमनाने बाजारपेठेत रौणक

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाने बाजारपेठेत रौणक

एकमत ऑनलाईन

लातूर : गौरींचे आगमन दि. १२ सप्टेंबर रोजी झाले. त्यानिमित्ताने रविवार सुटीचा दिवस असला तरी ज्येष्ठ गौरींच्या आगमनानिमित्त बाजारपेठत एकच गर्दी झाली होती. यंदा भाज्या व फुलांचे दर वाढल्याने तरी सण म्हणून नागरीक खरेदी करताना दिसत आहेत. गौरींचे मुखवटे, कोथळे, यांना सर्वाधिक मागणी आहे.

स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पर्त्याच्या, लोखंडी सळयांच्याकिंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते.

तेरड्याचे रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी, महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळीकिंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मीकिंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात

फूलशेती यंदा चांगलीच बहरलेली असल्याने बाहेरुन येणा-या फुलांची आवक तशी कमीच झाली आहे. एरव्ही स्वस्त मिळणारे फुलांचे हार, गज-यांना खूप मागणी असल्याने आजपासून तर याचे दर आणखी वधारतील, असे दिसत आहे. सध्या लहान हारदेखील ६० ते ८० रुपयांना विकला जात आहे. गौरींसाठीचा एक हार उद्या ३०० रुपयांहून अधिक किमतीत विकला जाईल, असे सांगितले जात आहे.

वास्तविक पाहता श्रावण व भाद्रपद हे पावसाचे महिने असल्याने या काळात फूल व भाज्यांचा सिझन असतो. त्यानूसार यंदा बाजारात भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. गौरी सणासाठी लागणा-या सर्व भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. अनेक पालेभाज्यांचे दर दोन दिवसांपूर्वीच गगनाला भिडले होते. दरम्यान गौरीच्या सणासाठी लातुरात बाजार सजला असून गौरींचे मुखवटे, हात, कोथळे, सजावटीचे साहित्य, फ ळांचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

फु लांच्या हाराच्या किंमती वाढल्या
ज्येष्ठा गौरींचे रविवारी रात्री घरोघरी आगमन झाले. पुजेसाठी लागणा-या फु लांच्या हारासाठी सुभाष चौक, दयानंद गेट, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी परिसरात फु लांच्या हाराची मोठी विक्री सुरु झाली. रविवारी लक्ष्मीच्या हाराची जोडी ३०० रुपयांपर्यंत ते ७०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध झाले. लहान हारांची १०० रुपयांपर्यंत विक्री झाली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या