26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeलातूरदेश चालविण्याची खरी ताकद महिलांमध्येच: स्वामी

देश चालविण्याची खरी ताकद महिलांमध्येच: स्वामी

एकमत ऑनलाईन

चाकूर : प्रतिनिधी
पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षणाची बंदी होती. चूल आणि मूल हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याचे पहावयास मिळत होते परंतु आज देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी कर्तृत्वाने झेप घेतली आहे. इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून तर प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती म्हणून देशाचा यशस्वी राज्यकारभार केला आहे. आज देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्म याही एक महिला असून त्या देशाची यशस्वी धुरा सांभाळत असल्याने देश चालविण्याची खरी ताकद महिलांमध्ये आहे, असे प्रतिपादन चाकूर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती शिवदर्शन स्वामी यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त चाकूर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नगरपंचायतमधील सर्व सफाई महिला कामगारांचा साडीचोळी ,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. मंचावर सत्ताधारी पक्षाच्या गटनेच्या हिरकण लाटे, नगरसेविका गोदावरी पाटील, गंगुबाई गोलावर, सुजाता रेड्डी, शुभांगी कसबे यांची प्रमुख होती. यावेळी उपनगराध्यक्ष अरंिवद बिरादार, बांधकाम सभापती मिंिलंद महांिलंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुत्रसंचलन बालाजी स्वामी यांनी केले.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अरंिवद बिरादार, विरोधीपक्ष गटनेते करीमसाहेब गुळवे, स्वच्छता व आरोग्य सभापती अभिमन्यू धोंडगे ,पाणीपुरवठा सभापती भागवत फुले, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, मुज्जमिल सय्यद, नितीन रेड्डी यांच्यासह इलियास सय्यद, राम कसबे , संजय पाटील , नरंिसंग गोलावर ,शिवदर्शन स्वामी व नगरपंचायतमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात नगरपंचायतमधील ५३ महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात
आला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या