23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरसताळा येथील नूतन सोसायटी संचालकाचा सत्कार

सताळा येथील नूतन सोसायटी संचालकाचा सत्कार

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सताळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच अटीतटीची निवडणूक झाली. निवडून आलेल्या सर्व संचालकाचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.मंगलताई खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जनसेवा शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागा ंिजकल्या असल्याने सर्व नवनिर्वाचित सोसायटीच्या संचालकाचा सत्कार येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नुतन संचालक बालासाहेब माहळंकर, उद्धव मुंडे, वैजनाथ ढवळे, युनूसपाशा फकिर, सुधीर मुदगडे, रामराम शिंदे,लहुदास शिंदे,किशन सोमवंशी,कोंडीराम गायकवाड,सौ.केवळबाई पवार,सौ.अनिता शेरे, रमाकांत खंदाडे, नरंिसंग मुंडे, या नुतन संचालकांचा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सन्मानपूर्वक सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे,राजू खंदाडे, गोंिवंदराव गिरी, रामभाऊ नरवटे,दत्ता खंदाडे, विठ्ठल खंदाडे, सुरेश जाधव, शंकर ंिहडे,अंतरात ंिहडे, दामोदर कांबळे, रघुनाथ मुंडे,सैबाजी केंद्रे, विजय कुलकर्णी, रघुनाथ सोमवंशी, वठ्ठिल शिवपुरे, नरंिसंग शिंदे, सुनील मुंडे, बालाजी खंदाडे,जिवंत मुंडे यांच्यासह सताळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या