21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरदूध संकलनात ११ हजार लिटर्सने घट

दूध संकलनात ११ हजार लिटर्सने घट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी चांगला पाऊस होऊन पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. गेल्यावर्षीच्या जुलै महिण्याच्या तुलनेत यावर्षी जुलै मध्ये प्रतिदिन सरासरी १० हजार ९४९ लिटरने दुध संकलनात घट झाली आहे. यात दूध दर वाढीने शासनाचे दूध संकलन मार्च पासून बद झाले आहे. तसेच खाजगी दुध संस्थांच्या दूध संकलनातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

लातूर जिल्हयात जिल्हा सहकारी दुध उत्पादक व पुरवठा संघ म.लोणी ता. उदगीर अंतर्गत ६ हजार १७६ लिटर दुध संकलन सुरू आहे. तसेच खाजगी मध्ये हेरीटेज दुध डेअरी ली. उदगीर, सायबर दुध डेअरी (अमूल) लोहारा ता. उदगीर, जर्शी दुध डेअरीच्या शाखा किल्लारी, निलंगा व नळेगाव, मस्तकी दुध डेअरी अहमदपूर, उजना दूध डेअरी अहमदपूर यांच्या माध्यमातून खाजगी दूध उत्पादक संस्थांचे जुलै महिण्यात प्रतिदिन सरासरी ६३ हजार ४९४ लिटर दूध संकलन झाले आहे.

लातूर जिल्हयात सरसरी ७९१.६० मिलीमिटर पाऊस पडतो. त्या तुलनेत यावर्षी ४९८.२० मिलीमिटर सरासरी पाऊस पडला आहे. या पावसामुळे पशुधनाच्या चा-याचा प्रश्न मिटल्याने सध्या जिल्हयात मुबलक चारा उपलब्ध आहे. तसेच ऊसाची लागवड झाल्याने त्याच्या भोवती हिरवा चारा मोठया प्रमाणात लावला आहे. पशुधनास ज्वारी, पिवळे, सोयाबीन व हरभ-याचे गुळी सोबत मका, घास, गवत असा हिरवा चाराही पशुधनासाठी उपलब्ध झाल्यामुळे शेतक-यांनाही दिलासा मिळाला आहे. तसेच दुधाचा जोड धंदाही वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

मदर डेअरीकडे दूध उत्पादकांचे लक्ष
लातूर जिल्हयात सध्या दूध संघ व सहा खाजगी संस्थांच्या माध्यमातून दूध संकलन दररोज होत आहे. या बरोबरच मदर डेअरीने आपले कार्यक्षेत्र वाढवण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून जिल्हयात सध्या एमआयडीसी लातूर व अहमदपूर येथून दूध संकलन होत असून गायीच्या दुधाला प्रति लिटर ३२ रूपये, खाजगी ंसस्थाकडून सर्वाधिक प्रति लिटर ३५ रूपये, मदर डेअरीकडून म्हैशीच्या दुधाला सर्वाधिक प्रति लिटर ४७.५० रूपये, तर खाजगी संस्थाकडून प्रति लिटर ४६.४० रूपये दर दिला जात आहे. त्या तुलनेत शासनाचा दर १० रूपयांनी कमी असल्याने त्यांचे दूध संकलन बंद झाले आहे.ू

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या