28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरराज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी २७० स्पर्धकांची नोंदणी

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी २७० स्पर्धकांची नोंदणी

एकमत ऑनलाईन

लातूर : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालय व लातूर जिल्हा बॅडंिमटन असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते १० मे दरम्यान चार दिवसीय ‘श्री गुरुनाथ खुबा मेमोरियल स्टेट वेटरन्स बॅडंिमटन चॅम्पियनशिप २०२२’ या राज्यस्तरीय बॅडंिमटन स्पर्धेचे आयोजन दयानंद इंडोर स्टेडियम येथे करण्यात आलेले आहे. या बॅडंिमटन स्पर्धा ३५ वर्ष वरील, ४० वर्ष वरील, ४५ वर्ष वरील, ५० वर्ष वरील, ५५वर्ष वरील, ६० वर्ष वरील, ६५वर्ष वरील, ७०वर्ष वरील, वयोगटात पुरूष स्ािंगल्स, महिला सिंगल्स, पुरुष डबल्स, महिला डबल्स व पुरुष महिला मिक्स डबल्स याप्रमाणे सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून २७० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.

या स्पर्धेच्या ऑनलाइन उद्घाटन महाराष्ट्राचे अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कुलवंतकुमार सारंगल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लातूर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारीअभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. या स्पर्धा बॅडमिंटन प्रेमींसाठी व लातूरकरांसाठी एक विशेष पर्वणी आहे, म्हणून या सुवर्ण संधीचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, लातूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. आशिष बाजपेयी, प्राचार्या डॉ. पुनम नाथानी यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या