18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूर‘सारख कांहीतरी होतय’नाटकाच्या प्रवेशिकेचे प्रकाशनc

‘सारख कांहीतरी होतय’नाटकाच्या प्रवेशिकेचे प्रकाशनc

एकमत ऑनलाईन

लातूर : जानाई विद्यार्थी मंडळाने प्रशांत दामले व वर्षा उजगांवकर यांच्या प्रमुख भुमीका असलेले ‘सारखं कांहीतरी होतय’ या नाटकाचे सादरीकरण १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात होणार आहे. त्यासाठीच्या प्रवेशिकेचे प्रकाशन करण्यात आले.

नाटकाच्या प्रवेशिका विक्रीचा शुभारंभ औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी आरसीचे संचालक प्रा.शिवराज मोटेगांवकर यांच्या हस्ते नाटकाच्या प्रवेशिकेचे व नाटकाच्या पोष्टरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. वैशाली टेकाळे, प्रा. दत्तात्रेय मुंढे, डॉ. मनोज शिरुरे, डॉ. अभिजित मुगळीकर, अभियंता अतुल ठोंबरे, सारंग अयाचित, समर्थ कुलकर्णी, अवंतीका प्रयाग, रेणू पाटील उपस्थित होते. श्री जानाई प्रतिष्ठानने मागील २२ वर्षात २२ संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यातून जो निधी संकलीत झाला त्यातून १३५ विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व ते अभियंते झाले. या नाटकाच्या आयोजनातून जो निधी संकलीत होईल त्या निधितून ११ गरजू हुशार होतकरु विद्यार्थ्याची अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश शुुल्क भरले जाणार आहे. या नाटकाच्या प्रवेशिका घेऊन सर्वांनी नाटकास उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. ऋजूता अयाचित, प्रसाद उदगीरकर, महेश औरादे, अमोल तांदळे, सौरभ ताथोडे यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या