21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeलातूरलातूर शहरातील जुनी अतिक्रमणे काढली

लातूर शहरातील जुनी अतिक्रमणे काढली

एकमत ऑनलाईन

लातूर : शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी खुप वर्षांपासून असलेली जूनी अतिक्रमणे महानगरपालिकेने दि. २९ जुलै रोजी काढली. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल स्वत: या कारवाईत सहभागी झाल्याने अतिक्रमणे काढताना फारसा विरोध झाला नाही. दरम्यान शहरातील अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा ते अतिक्रमण महापालिकेच्या वतीने जप्त करण्यात येईल, असे आवाहन आयुक्त मित्तल यांनी केले आहे. शहरातील जुने रेल्वे स्टेशनच्यासमोर व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करुन हॉटेल, पानटपरी, खानावळ, गॅरेजसह विविध व्यवसाय चालत होते.

या परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणाची संख्या वाढत गेली आणि संपूर्ण परिसराला बकाल स्वरुप आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घेऊन हा परिसर मोकळा करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. परंतू, त्यास कोणीच दाद दिली नसल्याने महानगरपालिकेने गुरुवारी हे अतिक्रमण काढून सर्व साहित्य जप्त केले. सुमारे २५-३० वर्षांपासून जुने रेल्वे स्टेशनच्या अगदी प्रवेशद्वारापासून ते संपुर्ण परिसरात अतिक्रमणे होती. अत्यंत मोक्याच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय थाटले होते.

महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची स्वत: जुने रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमीत जागेत उपस्थित राहूण अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. यावेळी उपायुक्त सुंदर बोंदर, ‘सी’ झोनचे समाधान सुर्यवंशी, सर्व स्वच्छता निरीक्षक, अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने सुमारे सात ते आठ अतिक्रमणे काढूुन सर्व साहित्य जप्त केले.

एक महिन्याची मुदत पण कोणाचाच दावा नाही
जुने रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. त्या सर्व अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेच्या वतीने मनपा अधिनियम १९४९ व ८१ ‘ब’ खाली नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. अतिक्रमणधारकांनी त्यांचे अतिक्रमण नसून ती जागा त्यांची स्वत:च्या मालकीची असल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याची मुदत दिली होती. या मुदतीत एकाही अतिक्रमणधारकाने जागा स्वत:ची असल्याचा दावा करणारी कागदपत्रे दाखल केली नाही आणि नोटीसीची दखलही घेतली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने सर्वच्या सर्व अतिक्रमणे काढून टाकली, असे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी सांगीतले.

अस्वस्थ एकात्मता!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या