36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्प अजूनही तहानलेला

रेणा मध्यम प्रकल्प अजूनही तहानलेला

एकमत ऑनलाईन

रेणापुर (सिद्धार्थ चव्हाण) : पावसाळा संपून सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसाने राज्य, मराठवाडा विशेषात: लातूर जिल्हयात थैमान घातले. त्यामुळे हाताशी आलेल्या सोयाबिनचे नुकसान झाले. तसेच जिल्हयातील सर्वच प्रकल्प तुडंब भरले असताना तालुक्यातील निम्या गावांची तहान भागवणा-या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पअजुनही तहानलेला असुन पाणीसाठयात वाढ झाली नाही. सध्या प्रकल्पात केवळ २९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच व्हटी प्रकल्पातही केवळ १८ टक्के पाणी आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजनां अवलांबुन आहेत. गत वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार अशी भिती व्यक्त केली जात असतानांच अचानक गत वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने दिलासा दिला. एका आठवडयातच रेणा मध्यम प्रकल्पात ९.८३१ दश लक्ष घन मिटर म्हणजेच ४७.८३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तर गत मे महिन्यात रेणा मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला.

या वर्षी रेणापुर तालुक्यात जुन मध्ये मृग नक्षत्रात पाऊसास प्रारंभ झाला. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतक-यांनी खारीपाच्या पेरण्या केल्या. तालुक्यात पिकांसाठी पोषक पाऊस पडत गेल्याने पिके चांगली बहरली. मात्र निम्या तालुक्याची तहान भागवणा-या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसळा संपला तरी मोठा दमदार पाऊस न झाल्याने पाणी साठा झाला नाही.

दरम्यान पावसाळा संपून आता गेल्या तीन दिवासा पासुन परतीच्या पावासाने राज्यासह मराठवाडा, विशेषता लातुर जिल्हयात थैमान घातले. त्यामुळे हाताशी आले सोयाबीन गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे रेणापूर प्रकल्पांच्या परिसरात पाऊस न झाल्याने या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे.

भोसले हायस्कूलमध्ये तयार होतोय नीटचा उस्मानाबाद पॅटर्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या