रेणापूर : लातुर येथील जिल्हा क्रीडा संकुलात लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा देवणी विरुद्ध रेणापूर यांच्यात सामना मंगळवारी दि. २४ रोजी रेणापूर क्रिकेट संघाने ५ गडी राखुन दणदणीत विजय मिळवून सेमीफायनल दाखल झाले.
रेणापूर विरुद्ध देवणी क्रिक्रिेट संघाची नाणेफेक काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरीराम कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेस तालुकाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, सेवादल जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, ओबीसी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. देवणी संघाने नाणेफेक ंिजंकुन बॅटींग करीत ७ ओव्हरमध्ये १० गडी बाद होऊन ६१ धावांचे लक्ष ठेवले होते. रेणापूर क्रिकेट संघाने ५ गडी राखुन ५ ओव्हर मध्ये धडाकेबाज खेळी करीत सेमीफायनल दाखल रेणापुर संघ क्रिक्रेट प्रेमीनी आनंदोत्सव साजरा केला.