19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरभक्तीमय वातावरणात रेणुका देवीची घटस्थापना

भक्तीमय वातावरणात रेणुका देवीची घटस्थापना

एकमत ऑनलाईन

रेणापूर :भक्ती व मंगलमय वातावरणात रेणापूर येथे शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली. रेणापूर येथे घटस्थापनेच्या दिवशीच मंदिरे उघडल्याने सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी १ वाजता तहसिलदार सौ धम्मप्रिया गायकवाड व देवस्थान समितीचे कार्यकारी अध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त गिरी, मल्लिकार्जुन हलकुडे, तुकाराम कोल्हे,पुंडलिक इगे, रमाकांत वाघमारे,रावसाहेब राठोड,दिलीप आकनगिरे, गुरुसिद्ध उटगे,पंडित माने,मंडळाधिकारी दिलीप देवकते, तलाठी गोंिवद शिंगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पारंपरिक पुजारी श्रीकांत धर्माधिकारी यांच्या मंत्रोच्चारात विधी झाला.

दरवर्षी प्रमाणे विविध धार्मिकम कार्यक्रमाचे आयोजन न करता यावर्षी निर्बंधांमुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दस-यांच्या दिवशी पालखीने महोत्सवाची सांगता होते पण यावषीच्या पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषयक नियम पाळून उत्सव साजरा केला जात आहे. मास्क परिधान केल्याशिवाय भक्तांना मंदिरात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.दरम्यान पोलिस अधीक्षक निखिल ंिपगळे यांनी मंदिरात भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या