22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरगेट दुरुस्त करुन वाहून जाणारे पाणी थांबवले

गेट दुरुस्त करुन वाहून जाणारे पाणी थांबवले

एकमत ऑनलाईन

लातूर : तावरजा नदीवरील भुसणी बराजचे एक गेट व्यवस्थित बसत नसल्याने काही प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे समजताच विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गुरुवारी सकाळी त्या ठिकाणी तात्काळ जाऊन पाहणी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना या संदर्भात माहीती देण्यात आली असता त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिक-यांना संपर्क करुन तात्काळ गेट दूरुस्तीचे निर्देश दिले. त्यानंतर संबधीत विभागाकडून युध्दपातळीवर कार्यवाही होवून दुपारपर्यंत वाहून जाणारे पाणी थांबवण्यात यश आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती अशी की, भूसणी बराजचे एक गेट ऑपरेट होत नसल्यामूळे तेथून पाणी वाहून जात असल्याची माहिती विलास सहकारी साखर कारखाना अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांना मिळताच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख यांच्यासह गुरुवारी सकाळी बराजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पालकमंत्री अमित देशमुख यांना या संदर्भातील माहिती कळविण्यात आली. त्यांनी जलसंपदा विभागास तात्काळ संपर्क केला, पाऊस थांबलेला असल्यामुळे बराजमध्ये वाहून जाणारे पाणी तात्काळ थांबायला हवे, असे सांगून गेट दुरुस्तीसाठी युध्द पातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत जगताप यांनीही यांत्रीकी विभागाला सोबत घेऊन यावर तातडीने कार्यवाही सुरु केली. दुपारपर्यंत वाहून जाणारे पाणी थांबवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच बराजच्या ठिकाणी दुरुस्तीची काम हाती घेऊन यापूढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. विलास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी भुसणी बराजला भेट दिली तेंव्हा त्यांच्या समवेत, नियोजन समिती सदस्य विजय देशमुख, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, भुसणीचे सरपंच वीरभद्र दगडू स्वामी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे राऊत, इंजिनिअर विभागाचे जाडकर, राजकुमार मुक्तापुरे, अंतेश्वर साखरे, राज पतंगे, शेतकरी उमेश गुरमे, शेतकरी शिवाजी भारती आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेतकरी वर्गातून आनंद आणि समाधान व्यक्त
भूसणी बराजवर विलास सहकारी साखर कारखाना अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट दिल्यानंतर, पालकमंत्री देशमुख यांच्याकडून यासंदर्भात दखल घेण्यात घेण्यात येऊन, जलसंपदा विभागला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, जलसंपदा विभागाकडूनही युध्द पातळीवर बॅरेजची दुरुस्ती होवून वाहून जाणारे पाणी थांबवल्यामूळे शेतकरी वर्गातून आनंद आणि समाधान व्यक्त केल जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या