24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरकेंद्र सरकारचा दुधभुकटी आयातीचा निर्णय रद्द करा

केंद्र सरकारचा दुधभुकटी आयातीचा निर्णय रद्द करा

एकमत ऑनलाईन

लातूर :दुध दराविषयी केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेत असल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत़ सध्या मिळत असलेल्या दुधदरामध्ये दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा भरुन निघत नाही़ त्यातच सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे़२३ जून रोजी केंद्र सरकारने १० हजार टन दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे दुध उत्पादकांचे नुकसान होत आहे़ हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी (पक्ष) शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील निळकंठेश्वर मंदीरात दुग्धाभिषेक करण्यात आला.

केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे़ ३० हजार टन दुध भूकटीचा बफर स्टॉक करावा, दुध भुकटीस प्रति किलो ३० रुपये अनुदान द्यावे, लॉकडाऊनच्या काळातील ३ महिन्यांपर्यंतच्या दुधास प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान दुध उत्पादकांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावेत, दुग्धजन्य पदार्थावर लावलेला जीएसटी कर तात्काळ रद्द करावे आदी मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधबंद आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील निळकंठेश्वर मंदीरात दुग्धाभिषेक करण्यात आला़ सरकारला जागे करण्यासाठी आज गांधीतत्वानूसार आंदोलन करण्यात आले़ सरकारने मागण्या मान्य नाही केल्यास मात्र शहरांचा दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा स्वाभीमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Read More  दुधाच्या सानुग्रह अनुदानासाठी भाजपचे निवेदन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या