25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरनिलंगा तालुक्यातील २२ पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण जाहीर

निलंगा तालुक्यातील २२ पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा तालुक्यातील २२ पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण जाहीर झाले असून अनेक गाव पुढा-यांचे गण आरक्षित झाले असल्याने थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थीती आहे . जिल्हापरिषद गट आरक्षित झालेले प्रमुख कार्यकर्ते पंचायत समिती गणाकडे वळणार आहेत . आरक्षणामुळे सर्वच समीकरण बदलले आहे . पंचायत समिती गणात पानचिंचोली येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या समर्थकाची दावेदारी राहणार आहे. तर शेडोळ गण नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी असल्याने येथे अनेकांचा हिरमोड झाला आहे. निटूर गण हा पुन्हा सर्वसाधारणसाठी असल्याने येथे मोठी चुरस राहणार आहे.

शिरोळ-वांजरवाडा अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित असल्याने येथे चुरस राहणार आहे. अनसरवाडा पंचायत गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने माजी सभापती अजित माने यांचा हीरमोड झाला आहे. त्यांना बोरसुरी गट सर्वसाधारणसाठी असल्याने लक्ष जिल्हा परिषदेकडे राहणार आहे. कोकळगाव गण हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने येथे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष जिल्हा परिषद सरवडी गटाकडे राहणार आहे. तांबाळा पंचायत समिती गण आरक्षित सर्वसाधारणसाठी झाल्याने येथे सभापती राधाताई बिराजदार यांचा हिरमोड झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या