23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeलातूर६१ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

६१ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘व्हिजन २०२४’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे आजवचे माजी मुख्यमंत्र्याच्या शक्तीस्थळ समाधीचे दर्शन घेऊन दि १३ सप्टेंबर रोजी व्हिजन एकसष्टी ज्योतीचे आगमन बाभळगाव येथील विलास बागेतील विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणास्थळ येथे झाले. प्रेरणास्थळाचे दर्शन घेतल्यानंतर साहेबांच्या घरी छोटेखाली स्वागत कार्यक्रम झाला. त्यावेळी कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी व्हिजन एकसष्टी ज्योतीचा उद्देश नमुद करताना राज्यात ६१ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याची माहिती दिली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, संजय गांधी निराधार समितीचे ग्रामीण अध्यक्ष प्रविण पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, प्राचार्य एकनाथ पाटील, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, अविनाश देशमुख, मुक्ताराम पिटले, मनोज पाटील, सुभाष घोडके, बंदेनवाज सय्यद, जहांगीर सय्यद, अ‍ॅड. कैलास मस्के, गोविंद देशमुख, गोपाळ थडकर, गणपत भाडूळे,
सचिन मस्के, प्रताप पाटील, रघूनाथ शिंदे सुधीर थडकर, अब्दल्ला शेख, प्रशांत पाटील, सागर तुपे, रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशवंत ग्रीन महाराषट्राची एकसष्टी ज्योत दि. १० सप्टेंबर रोजी सातारा येथून निघाली. तेथे महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेवून निघालेल्या या ज्योतचे दि. १३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात आगमन झाले. निलंगा येथे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ही ज्योत बाभळगाव येथील विलासबागेत पोहोचली. तेथे विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेतले.

त्यानंतर बोलताना गोविंदराव पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र घडवला. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राज्यात ६१ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असून आतापर्यंत १२०० गावांत या संकल्पाला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगीतले. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेतल्यानंतर गोविंदराव पवार व त्यांच्या सहकार्यांनी प्रेरणास्थळाच्या परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी उपरोक्त मान्यवर उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या