लातूर : प्रतिनिधी
येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा दयानंद सभागृहात झाला. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण सर्वोच्च शिक्षण असते, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते व नाट्य कलावंत राहूल सोलापुरकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुरपे, प्रा. चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव, प्रविण सरदेशमुख, केशवराज प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. मनोज शिरुरे, स्थानिक व्यवस्था मंडळ अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर, रेनिसन्स सीबीएससी स्कूलचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, शिशूवाटिका अध्यक्षा योगिनीताई खरे, आस्था संकुलाचे प्रमुख उमेश गाडे, जनसंपर्क अधिकारी राहूल गायकवाड, केशवराज माध्यमिक विद्याालयाचे मुख्याध्यापक सुनिल वसमतकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे, रेनिसन्स सीबीएससी स्कूलच्या प्रधानाचार्या अलिशा अग्रवाल हे उपस्थित होते.
यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे नूतन कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, जितेश चापसी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे तर सूत्रसंचलन राजश्री कुलकर्णी व वैशाली फुलसे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांनी केले. संतोष बीडकर यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील वसमतकर, बालासाहेब केंद्रे, बबनराव गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी राजारामपंत बिलोलीकर, अॅड. विश्वनाथ जाधव, अॅड. जगन्नाथ चिताडे, माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.