लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त येथील विष्णुदास मंगल कार्यालयात आयोजित विराट कीर्तन महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. या किर्तन महोतसवाचा लाभ या परीसरातील भावीक भक्तांनी घेतला. विश्व वारकरी संघ, लातूर आयोजित एक दिवसीय विराट कीर्तन महोत्सव पार पडला. जगाच्या पाठीवर मानव जीवनात प्रगती बरोबर आस्था, ईश्वराची श्रद्धा यामुळे आपण नैतिक मूल्ये जतन करू शकतो. आमचे धर्मगुरु आणि धर्मग्रंथ यांच जगाच्या पाठीवर एक आगळेवेगळे स्थान आहे.
आमची ही परंपरा जोपासण्याचे आणि वृंिद्धगत करण्याचे काम वारकरी संप्रदायातील साधुसंतांनी केले आहे. यासाठीच विश्व वारकरी संघ लातूर जिल्हा यांनी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या किर्तन महोत्सवास ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, दिशा प्रतिष्ठान लातूर अध्यक्ष अभिजीत देशमुख, निराधार कमिटी चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय साळुंखे, संतोष सोमवंशी, तुकाराम पाटील, लालासाहेब चव्हाण, प्रवीन घोटाळे यांनी भेट दिली.
या किर्तन महोत्सवाचे आयोजनात लातूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, विलास कारखाना संचानक अनंत बारबोले, अध्यक्ष लातूर तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग ज्ञानोबा गवळी, रमेश सुरवसे, माधव गंभीरे, शरद शिंदे, व्यंकटराव वागलगावे, अॅड. व्यंकटराव पिसाळ, भरत सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, सुभाष जाधव यांनी परीश्रम घेतले.