लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव आणि कै. भगवानराव देशमुख सेवाभावी संस्था बाभळगाव व ग्रामपंचायत कार्यालय बाभळगाव, हरित बाभळगाव ग्रुप, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्व रोगनिदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जागृती कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयचेअधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर, कै. भगवानराव देशमुख सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तानाजी देशमुख, डॉ. जितेन जयस्वाल, डॉ. रीना जैस्वाल, डॉ. तहनियत सत्तारी, जितेंद्र शिंदे, डॉ. उदय मोहिते, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विभागाचे अध्यक्ष डॉ. मेघराज चावडा व वैद्यकीय समन्वयक डॉ. आनंद बरगाले, डॉ. चंद्रमोहन हरणे, नर्सिंग कॉलेज बाभळगावचे प्राचार्य अमोल आडे, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, महावीर शेळके यांची उपस्थित होते. या शिबिराचा २२५ रुग्णांनी लाभ घेतला. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी केले. सहकारमहर्र्षि दिलीपराव देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. सूत्रसंचालन डॉ. जितेन जयस्वाल यांनी केले तर आभार डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी केले.