22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात रिमझिम पाऊस

शिरूर अनंतपाळ तालुक्यात रिमझिम पाऊस

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासुन ढगाळ वातावरणात अखंडीत रिमझिम पाऊस सुरू आहे. या बदललेल्या वातावरणाने तालुका गारठला असून चार दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नाही. सततच्या पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षी बहुतांश शेतक-यांंनी खरिप हंगामात सोयाबीन या पिकाची मोठी लागवड केली आहे.शिरूर अनंतपाळ, साकोळ व हिसामाबाद या तीन महसूल मंडळात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाने शेतातील पिकामध्ये पाणी साठले आहे परिणामी शेतक-यांनी अति पावसाचा फटका बसला असून या पावसाने तालुक्यातील पिकाचे मोठे नुकसान होत असून खरिप हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान गेल्या चार दिवसांपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यात संततधार पाऊस सुरूच असल्याने अनेक शेतातील पिकामध्ये पाणी साठले तर नदी नाले वाहत आहेत. पाऊस सतत सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून सततच्या पावसामुळे नागरिक घरात बसणेच पंसत करीत आहेत. रिमझिम पावसाने गोठ्यातील जनावरांची तारांबळ उडाली असून असाच पाऊस सुरु राहिला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात चार दिवसांपासून तालुक्यात सूर्यदर्शन झालेच नसल्याने थंडीचे वातावरण पसरले आहे. या रिमझिम पावसाने शेतक-यांच्या पिकावर रोगराई पडून उभे पिके धोक्यात आली आहेत. या बदललेल्या वातावरणाचा सर्वाधिक फटका कोवळ्या पिकांना बसत असून सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकाची वाढ खुंटून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भिती निर्माण झाली असून या अस्मानी संकटाने शेतकरी अडचणीत आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या