24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरमराठा आरक्षणासाठी निलंगा येथे रस्ता रोको

मराठा आरक्षणासाठी निलंगा येथे रस्ता रोको

एकमत ऑनलाईन

निलंगा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी व जोपर्यंत स्थगिती उठणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती करण्यात येऊ नये या मागणीसाठी निलंगा येथे संभाजी सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्तारोको आंदोलन करीत मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

निवेदनात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपयेची मदत द्यावी. अशीही मागणी करण्यात आली आहे. संभाजी सेनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पहिल्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले तर सोमवारी (दि २८) दुस-या टप्प्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन राजे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गोमसाळे, तालुका संपर्कप्रमुख राजकुमार साळुंखे ,तालुका कार्याध्यक्ष अनिल पौळ, तालुका उपाध्यक्ष तुळशीदास साळुंके, विभागाध्यक्ष बालाजी दरेकर, दत्ता साळुंके, मराठा महासंघाचे संभाजी तारे आदी उपस्थित होते.

वाहतुकीच्या दरात वाढ केल्याशिवाय कामगारांनी ऊस तोडू नये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या