24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरअतिवृष्टीने रस्ते, पूलांची दैना

अतिवृष्टीने रस्ते, पूलांची दैना

एकमत ऑनलाईन

लातूर : सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने लातूर जिल्हयातील लहान, मोठे १६५ पूल क्षतीग्रस्त झाले असून कांही पूल वाहून गेले आहेत. तर सततच्या पावसामुळे ५३४.७५ किलो मिटरच्या रस्त्याला अवकळा आली असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्ते अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण यंत्राना कांही प्रमाणात कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लातूर जिल्हयात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच दळणवळणाचा कणा समजले जाणारे रस्ते, पुलही पुरामुळे वाहून गेले आहेत. तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठया प्रमाणात शेतक-यांच्या पिकांचे व सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्हयात सरासरी ७३६.४ मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी आज पर्यत ९७२.३ मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या १३२ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्हयात सतत पडलेल्या पावसामुळे सप्टेंबर मध्ये १६५ लहान, मोठे पूल वाहून गेले आहेत. यात अतिवष्टीमुळे

निलंगा तालुक्यातील बसपूर ते बाकली रस्त्यावरचा पूलाचे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील हासाळा ते सिंदाळा, गाडगेवाडी ते दावतपुर या रस्त्यावरच्या पूलाचे नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील कुणकी ते धामनगाव रस्त्यावरच्या पूलाचा पूल, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नळेगाव ते बोरीच्या रस्त्यावरील पुलाचीही अशीच आवस्था झाली आहे. तसेच शेतक-यांच्या शेतीचेही पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.

गेल्यावर्षीही अतिवृष्टीचा बसला होता फटका
गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने लातूर जिल्हयातील लहान, मोठे ११९ पूल वाहून गेले होते. तर सततच्या पावसामुळे ५२५.९ किलो मिटरच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर पुलाच्या दोन्ही बाजूंचे १०० ते २०० मिटर पर्यंतचे ५० किलो मिटरच्या जवळपास रस्ते वाहून गेले होते. सदर रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार २९ कोटीचा रस्ते व पुल दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र रस्ते व पुलांची किरकोळ दुरूस्तीही होऊ शकली नाही. तर यावर्षीच्या पुल व रस्त्यांच्या दुरूसतीचा विषय केंव्हा मार्गी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुल, रस्ते दुरूस्तीसाठी १६३ कोटी ६७ लाखांची गरज
लातूर जिल्हयात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १६५ पेक्षा जास्त लहान, मोठे पूल वाहून गेले आहेत. सतत पडणा-या पावसामुळे ग्रामीण भागातील ५३४.७५ किलोमिटरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने त्या मार्गावरून वाहतुक होणे सोपे नाही. या रस्ते व पुल कायम दुरूस्तीचा १६३ कोटी ६७ लाखांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे यांनी दिली.

रस्त्यांचे लातूर तालुक्यात, तर पुलांचे निलंगा तालुक्यात सर्वाधीक नुकसान
सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर तालुक्यातील २० पुलांचे, १३०.४ किलो मिटर रस्त्यांचे, तर निलंगा तालुक्यातील ३९ पूलांचे व ७९.५ किलो मिटर रस्त्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील १४ पूल, ७६.६५ किलो मिटर रस्ते, औसा तालुक्यातील २१ पूल, ७२.१ किलो मिटर रस्ते, अहमदपूर तालुक्यातील २५ पूल, ७९.७ किलो मिटर रस्ते, चाकूर तालुक्यातील ११ पूल, १५.२ किलो मिटर रस्ते, उदगीर तालुक्यातील ७ पूल व ३१.७ किलो मिटर रस्ते, जळकोट तालुक्यातील ३ पूल, १९.५ किलो मिटर रस्ते, देवणी तालुक्यातील ६ पूल व ११ किलो मिटर रस्ते, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १९ पूल व १९ किलो मिटर रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या