29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरनिलंगा येथे अवैध कोवीड रुग्णालयांकडून लूट

निलंगा येथे अवैध कोवीड रुग्णालयांकडून लूट

एकमत ऑनलाईन

निलंगा : खाजगी रुगणालयात शासनाची परवानगी न घेता स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करून रुग्णावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. याकरिता शहरातील विना परवाना अवैध कोविड हॉस्पिटल तात्काळ सील करण्यात यावेत अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसह भिकणे यांच्या नेत्रत्वाखाली निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे करण्यात आली आहे.

निलंगा शहरातील काही खासगी रुग्णालयात शासनाची परवानगी न घेता स्वतंत्र कोवीड वॉर्ड बनवून रुग्णांची कोविड तपासणी व त्यांना अ‍ॅडमिट केले जात आहे.मात्र याची कुठलीही नोंदणी शासनाकडे केली जात नाही व रूग्णालाही कोविड रिपोर्ट दिला जात नाही. यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. यात तालुक्याच्या दररोजच्या जाहीर पॉझीटीव्ह रुग्ण संख्येत घोळ ,चुकीच्या रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आजार नियंत्रण नियोजनात त्रुटी, अशा अवैध कोविड हॉस्पिटलमध्ये कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्ण गम्भीर होऊन मृत्यू पावत आहेत.

या रुग्णालयातील कचरा निर्जंतुकीकरण न करण्याने सर्व शहरात कोविडचा मोठा रोगप्रसार होत आहे व महामारी वेगाने पसरत आहे. रुग्णाला अतीशय कमी ऑक्सीजन पुरवठा करून,उगाच नाकात नळी लावून रुगणांची मोठी लूट होत आहे. रुग्ण गंभीर केले जात आहेत. एम डी वा भुलत्जज्ञ या हॉस्पिटलमध्ये नसल्याने इथे तीन चार दिवस रुग्ण अयोग्य इलाजमुळे व रुग्णाला संजीवनी देणारे रेंमडेसीव्हर न मिळाल्याने तो सिरीयस झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला जात आहे तोही सोबत कोविड रिपोर्ट न देता कारण हे सर्व विनापरवना आहे.

सतत १८-२० स्कोरचे रुग्ण अचानक शासकीय रुग्णालयात आल्याने वैद्यकीय अधिका-यावर व यंत्रणेवर नागरिकांचा दबाव निर्माण होत आहे व रुग्ण दुरुस्त करण्याला कालावधी नसल्याने तो दगवत आहे. विनापरवाना रुग्ण दाखल करणे व विनापरवाना किटवर कोविड तपासणी करणे यामुळे ते कोविड रिपोर्टही रुग्णाला देत नाहीत व तो नसल्यामुळे शासकीय रुग्णालयात मृतदेह नातेवाईकांना द्यावे की नाही यावर मोठा गोंधळ होत आहे. गंभीर स्थितीला वैद्यकीय अधिका-यांना तोंड द्यावे लागत आहे. यांच्याकडे शासकीय परवाना, ऑक्सिजन, रेमडेसीवर,व्हेंटिलेटर,ट्रेंड स्टाफ, कोविड इलाजाची कुठलीही माहिती, त्याचे सेमिनार अटेंड करणे, तज्ज्ञ डॉक्टर हे काहीच नसताना हे रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. रक्ताच्या हजारो रुपयांच्या अनेक तपासण्या, सिटी स्कॅन, चार पाच दिवसाचे हॉस्पिटलचे मोठे बिल यामुळे जिथे इलाज होण्याचे कुठलेही पॅरामिटर्स नाहीत. तिथे रुग्णांना आर्थिकदृष्ट्या नागवले जात आहे.

त्यानंतर मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे. यामुळे अशा विनापरवाना कोविड हॉस्पिटलला जिथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत तिथे शासकीय परवानगी घेण्यास भाग पाडावे व त्यांना रेमडेसीवर इंजेक्शनचा पुरवठा करावा. जे अवैध कोविड सेन्टरला तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने परवानगी योग्य नाहीत. त्यांना ताबडतोब सील करून त्यांच्यावर महामारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करत रुग्णांमध्ये भीती निर्माण करणे,कोविड कच-याची विल्हेवाट यंत्रणा नसल्याने महामारी वाढविणे, शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणे व विनापरवाना सेन्टर चालऊन लोकांची आर्थिक पिळवणूक करणे या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सीजन टॅंक सुरक्षित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या