29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरकेळगाव-लांबोटा परिसरात बिबट्याची अफवा

केळगाव-लांबोटा परिसरात बिबट्याची अफवा

एकमत ऑनलाईन

निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील केळगाव- लांबोटा येथील वनविभागाच्या जंगलात आज सकाळी बिबट्या वाघ आल्याचे आफवेने नागरिक भयबीत झाले मात्र वनविभागाच्या टीमने सर्व परिसर ंिपजून काढला असता त्या ठिकाणी बिबट्याचे कसलेही ठसे दिसून आले नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये . तो निदर्सनास आलेला बिबट्या नसून तडस असल्याने नागरिकांनी भयभीत होऊ नये . मात्र नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनविभागाचे परिमंडळ अधिकारी संतोष बन यांनी केले आहे.

निलंगा तालुक्यातील केळगाव येथे वनविभागाची ६० हेक्टर व लांबोटा शिवारात ४० हेक्टर अशी एकूण १०० हेक्टर जंगल आहे. या जंगलात रामंिलगेश्वर देवस्थान आहे. या मंदिरात गोरखनाथ बाबा महाराज पूजा आरचा करण्यासाठी वास्तव्यास असतात ते दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या दरम्यान दररोज प्रमाणे मंदिराजवळ फेरफटका मारत असताना मोर पाणी पीताना दिसून आले. यावेळी मोरांचे फडफडणे पाहून बाबांनी पाहिले तर त्यांना बिबट्यासारखा प्राणी निदर्सनास आला. ही वार्ता केळगाव – लांबोटा परिसरात पसरली . या घटनेची माहिती देण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य महेश देशमुख यांनी वनविभागाच्या आधिका-यांशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार गणेश जाधव यांना कळविले.

तात्काळ तहसीलदार गणेश जाधव यांनी वनपरिमंडल अधिकारी संतोष बन यांना सांगितले. ही बातमी कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गिते, वनपरिमंडल अधिकारी संतोष बन, वनरक्षक बडगणे, मंगरुळे आदींसह विनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले व गुरू बाबा महाराजांसोबत घटनेची चर्चा केली. तेंव्हा बाबांनी कारवणी कुत्र्यासारखा गुटगुटीत वाघासारखा प्राणी दिसला व तो नर्सरीकडे पूर्व दिशेला गेल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे वनविभागाच्या आधिका-यांनी गुरू बाबांना वन्य प्राण्यांची वेगवेगळी चित्रे दाखवली. गुरुबाबानी तडस या प्राण्यावर बोट ठेवत हा प्राणी असल्याचे सांगितले. तेंव्हा वनविभागाच्या अधिका-यांना तो तडस प्राणी असल्याचे समजले. तदनंतर वनविभागाच्या टीमने घटनास्थळी व जंगलात पाहिले असता अधिका-यांना बिबट्याचे – वाघाचे ठसे कोठेही निदर्सनास आले नाहीत. याकरिता वनविभागाची टीम तैनात ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी भयभीत न होता स्वत:ची काळजी घ्यावी व सतर्क रहावे असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी संतोष बन यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या