लातूर : प्रतिनिधी
लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. एस. आर. देशमुख (काका) यांच्या पार्थिवावर सोमवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली अर्पण केली. माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख यांचे पूणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असतानाच दि. ५ जून रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी येथील मारवाडी स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एस. आर. देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख यांनी भडाग्नी दिला. यावेळी स्व. एस. आर. देशमुख यांच्या कुटूंबातील एन. आर. देशमुख, सतीश देशमुख, अप्पा देशमुख, त्यांच्या तीन्ही मुली उपस्थिती होत्या. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, अशोकराव पाटील निलंगेकर, अरुण देशमुख, अॅड. बळवंत जाधव, अॅड. उदय गवारे, मोहन माने, मोईज शेख, शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोक कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, अॅड. श्रीपतराव काकडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, यशवंतराव पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, ट्वेण्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, दिलीप पाटील, अनंतराव देशमुख, पंडित धुमाळ, शेषराव पाटील, चंद्रकांत चिकटे, मधुकर पाटील, सचिन दाताळ, पत्रकार अरुण समुद्रे, जयप्रकाश दगडे, हरीराम कुलकर्णी, अशोक चिंचोले, चंद्रकांत झेरीकुंठे, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. जाजू, अॅड. व्यंकट बेदे्र, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, चाँदपाशा इनामदार, संभाजी रेड्डी, जिल्हा बँक, संचालक, महापालिका सदस्य, मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्याचे संचालक मंडळ अधिकारी, उपजिल्हाधिकारी यादव, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सहकार, कृषी, जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सरपंच, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल अधिकारी, सर्वसामान्य नागरिक अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.