26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरआज सद्­­भावना इफ्तारचे आयोजन

आज सद्­­भावना इफ्तारचे आयोजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने शहराचे प्रथम नागरिक विक्रांत गोजमगुंडे यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी आज दि. १ मे रोजी सायंकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे.

रमजान हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिनाभराच्या कालावधीत मुस्लिम बांधव दिवसभर रोजा अर्थात उपवास करतात. सायंकाळच्या वेळी इफ्तार केला जातो. रमजान ईद निमित्त इतरही अनेक उपक्रम मुस्लिम बांधवांच्या वतीने राबवले जातात. या उत्सवात सहभागी होण्याच्या उद्देशाने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या वतीने आज सायंकाळी ६.३० वाजता कातपुर रोडवरील पार्वती मंगल कार्यालय येथे इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ६.३० वाजता मुफ्ती ओवेस यांच्याकडून दुवा पठण केले जाणार आहे. यावेळी नमाजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लातुर शहर हे नेहमीच सामाजिक एकतेचे प्रतीक राहिलेले आहे. लातूरने हिच संस्कृती जोपासत केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या