जळकोट : प्रतिनिधी
श्रीमती शिलाताई पाटील यांच्या नेतृत्वातील अतनूर वि. का. से. संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने लातूर येथील आशियाना बंगल्यावर सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्रीमती शिलाताई पाटील यांच्या सोबत आशिष पाटील, राजेंद्र गव्हाणे, व्यंकटराव पाटील, बालाजी गव्हाणे, शिवाजी कदम, व्यंकट निरणे, संजय स्वामी, बाबू भोईनर, सुभाष बोडेवार, बालाजी रेकूळवाड, मारुती गुंडीले, शिवाजी राठोड, सौ. सारिका पाटील हे नूतन संचालक, तसेच दिलीप गव्हाणे, साहेबराव येवरे, साहेबराव गव्हाणे, विजय गव्हाणे, रामचंद्र तोडकर, गणेश रेकूळवाड, मारोती भोईनर, राजेंद्र बंडरे, प्रभू गायकवाड, नितीन सोमुशे, शेषराव बंडरे, रमेश बोडेवार, नरेश कदम, मारोती कापडे, सटवा गायकवाड, संतोष वजीरे व अरंिवद सासट्टे हे उपस्थित होते.