26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरसहकारमहर्षी दिलीपराव देशमुख अकादमीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख अकादमीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

रेणापूर : प्रतिनिधी
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख अकादमीमधील दोन यशवंत विद्यार्थ्यांचा माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सोय व्हावी यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परिक्षा केंद्र रेणा सहकारी कारखाना निवाडा येथील साईडवर नि:शुल्क सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रातील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यात माधव पिनाटे (म्हाडा-ज्युनियर क्लार्क) रा. सिंंधगाव.व अरूण सुर्यवंशी (इंडोसंट-बँक,चेन्नई) रा. निवाडा. या दोघांची निवड झाली आहे. यावेळी रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस.चेअरमन .अनंतराव देशमुख, तज्ज्ञ संचालक अनिल कुटवाड, स्रेहलराव देशमुख, सचिव बरमदे रविशंकर, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण व स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक नवगिरे आदी उपस्थित होते

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या