22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरसाकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर अतिवृष्टीच्या रूपात पडलेल्या दमदार पावसामुळे घरणी प्रकल्पात ७४ टक्के, पांढरवाडी लघु प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती उपविभागीय उपअभियंता जी.बी. जाधव य्रनी दै. एकमतशी बोलताना दिली.

मान्सून पूर्व पावसानंतर पावसाळ्यात पाऊस पडला नसल्याने तालुक्यातील सर्व प्रकल्प व नदी नाले कोरडेठाक पडले होते.परिणामी पावसाळ्यात तालुकावासीयांना तीवृ पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाऊस पडत नसल्याने तालुक्यात कोरडा दुष्काळ सदृश परिस्थीती निर्माण झाली होती. अशात गेल्या सोमवारी झालेली अतिवृष्टी व त्यानंतर सलग पडलेल्या पावसाने नदी नाल्यांना पुर येऊन प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होवून साकोळ व डोंगरगाव शंभर टक्के भरले तर घरणी प्रकल्पात ७४ टक्के पाणी साठा झाला आहे.

या अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याचा व सिंंचनाचा प्रश्न मिटला असल्याने नागरिकासह शेतक-यातून समाधान व्यक्त केले जात आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७१५ मिमी एवढे असले तरी या वर्षी पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने अत्यल्प पाऊस पडला, परिणामी प्रकल्प कोरडेठाक पडले होते. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई नर्मिाण होऊन येणा-या काळात कोरडा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशात पावसाळ्यात पाऊस पडले नसले तरी अतिवृष्टीच्या पावसाने चांगलाच दिलासा दिला असल्याने तालुक्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणारे व हजारो हेक्टर जमीनी ओलिताखाली आणणारे घरणी,साकोळ व पांढरवाडी मध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली असून हालकी परिसरासह निलंगा तालुक्यातील गावांसाठी उपयुक्त असणारे डोंगरगाव बँरेज १०० टक्के भरले आहे. त्यात मांजरा नदीवरील धनेगाव बॅरेज अडविल्याने नदी पात्रात पाणी थांबले असल्याने पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या