27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeलातूरशेतक-यांना ना नफा ना तोटा तत्वावर औषध विक्री

शेतक-यांना ना नफा ना तोटा तत्वावर औषध विक्री

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शेतक-याच्या उन्नतीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या शिरूर अनंतपाळ सोसायटीच्या वतीने शेतक-याना खिशाला परवडणा-या दरात ना नफा, ना तोटा या तत्वावर पिकांवरील फवारणी साठीचे जैविक औषध विक्री केंद्राचा शुभारंभ गुरुवारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या प्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्या डॉ.शोभा बेंजरगे, अनिल देवंगरे, लोकाभिमुख चेअरमन रामकिशन गड्डीमे,व्हाईस चेअरमन गुरंिलग शिवणे, हिरालाल दुरूगकर, बाबु इंद्राळे, फक्रोद्दीन मुजेवार, नारायण नरवटे, शब्बीर पटेल, औदुंबर शिंदाळकर, मुरलीधर दिवेकर, प्रभावती बिराजदार, कुसूम तोंडारे, नामदेव लोखंडे, अरंिवद चेवले, सोमा तोंडारे, आसिफ उजेडे शेतकरी सभासद उपस्थित होते.

निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाचे पडलेल्या दरामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.त्यांना आधार मिळावा भावनेतून शिरूर अनंतपाळ सोसायटीने हा उपक्रम हाती घेतला आहे.सदर विक्री केंद्र सोसायटीच्या दुकानात सुरू करण्यात आले असून शेतक-यांना वर्षभर वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट पुणे यांनी तयार केलेले सर्व पिकांसाठी कृषी निविष्ठा (औषध) उपलब्ध होणार आहे. शिरूर अनंतपाळसह हणमंतवाडी, बोळेगाव बु.,नागेवाडी, आनंदवाडी, तुरुकवाडी, भिंगोली या सात गावांतील सभासद व इतर शेतक-यांनाही याचा लाभ होणार आहे.

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ सोसायटीच्या माध्यमातून सुलभ पीक कर्ज, ऊस कर्ज, तुषार व ंिठबक सिंंचन व खुला बारदाना शेतकरी सभासदांना उपलब्ध करून देत शेतक-यांंना मदतीचा हात देऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करीत असून सर्व शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकाभिमुख चेअरमन रामकिशन गड्डीमे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या