26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरभारत जोडो यात्रेत राहूल गांधींशी साळुंकेयांचा संवाद

भारत जोडो यात्रेत राहूल गांधींशी साळुंकेयांचा संवाद

एकमत ऑनलाईन

निलंगा : काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी व संपूर्ण भारत देश एकसंघ करण्यासाठी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या ‘भारत जोडो’ यात्रेत ंिहंगोली ्िजल्ह्यातील पदयात्रेदरम्यान त्यांनी कॉग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्याशी संवाद साधला. संवादात त्यांनी बेरोजगार तरुण व शेतक-यांच्या आडचणी विषयी चर्चा केल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंकेयांनी सांगितले.

मागच्या कांही वर्षापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉग्रेस पक्षाला एकप्रकारे मरगळ आल्याचे पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणची सत्ता हातातून जाताना दिसत आसल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात पक्ष सोडला. कॉग्रेस पक्ष शिल्लक राहील का नाही असे वाटत असतानाच कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत भारत जोडो पदयात्रा काढली आणि कॉग्रेस पक्षात नवसंजीवनी निर्मिाण झाली. या यात्रेतून हजारोंच्या संख्येने लोक जोडले जात आहेत. या यात्रेमुळे कॉग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मरगळ झटकून जोरदार कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या यात्रेसाठी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते अभय साळुंके यांच्यावर पदयात्रा रुट कमिटीची जबाबदारी देण्यात आली होती.
या कमिटीत त्यांनी प्रभावी कामगिरी करीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये आपली छाप पाडली. त्यामुळे त्यांना भारत जोडू यात्रेचे राज्याचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी काम करण्याची संधी दिली आहे. देगलूर येथील स्वागतापासून ते सलग दहा दिवस राहुल गांधी यांच्या यात्रेत पायी चालताना दिसत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी सामान्य नागरिकांपासून पक्षातील मोजक्या पदाधिकारी व नेत्यांनी संवाद साधत आहेत. सोमवारी (दि १४) रोजी सकाळी ंिहगोली ्िजल्ह्यातील वसपांगरा तेचिंचळा पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अभय साळुंके यांच्याशी जवळपास पंधरा मिनिटे संवाद साधला.

या संवादाच्या दरम्यान अभय साळुंके यांनी शेतक-यांच्या व्यथा मांडताना पीक विमा कंपनी प्रत्येक वर्षी जवळपास ५ हजार कोटी रुपये विम्याची रक्कम जमा करते व केवळ १००० ते १२०० कोटी रुपये रक्कम वितरीत करते. केंद्र सरकार वीमा कंपनीच्या नावाखाली उद्योगपतींना हाताशी धरून लूट करीत आहे. कॉग्रेस पक्षाने सुरु केलेली रोजगार हमी योजना अधिक व्यापक बनवून शेतीकामाचा समवेश जर मनरेगामध्ये केला तर शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतक-यांंना आधार मिळेल त्याचबरोबर तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या वतीने प्रोग्राम राबविण्यात यावा अशी मागणी अभय साळुंके यांनी करीत भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशातील आठरा पगड जाती धर्मातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निश्चीत येणा-या काळात देशात बदल दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला.

लातूर जिल्ह्यात विरोधी वातावरणातही सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजीमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अभेद्य असून आगामी सर्व निवडणुकात कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे राहुल गांधी यांना सांगताच तुम्हच्या सारख्या तरुणांच्या मागे पक्ष नक्की ताकद उभी करेल, असे अश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे साळुंके यांनी सांगितले. दरम्यान यात्रेत चालत असलेले कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अभय साळुंके यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे समर्थन करीत साळुंके यांचे कौतुक करीत गळाभेट घेतली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हीच तर खरी काँग्रेस पक्षाची ताकद आसल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या