लातूर : खरीपाचा निम्मा हंगाम संपत आला तरी अजूनही किटकनाशकाचे ११६ पैकी केवळ १२ नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत़ जिल्हयात सध्या चक्री भूंगा व पाने खाणाºया आळीचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात झाला आहे़ याला रोखण्यासाठी शेतकरी विविध कंपण्याचे किटकनाशके शेतकरी खरेदी करत आहेत़ सदर किटकनाशके सक्षम आहेत़ किंवा नाहीत हे प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच सिध्द होणार आहे़ तो पर्यत शेतक-यांची लूट होणार आहे.
लातूर जिल्हयात खरीपाचे ६ लाख ४८ हजार २३६ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण पेरणीचे आहे़ यावर्षी जून महिण्याच्या पहिल्या आठवडयापासूनच लातूर जिल्हयात चांगला पाऊस पडत आहे़ लातूर जिल्हयात सरासरी ७९१़६० मि़मी पाऊस पडतो़ जिल्हयात दि़ २६ जूलै पर्यत २९५़८८ मि़मी पाऊस झाला आहे़ या पावसाच्या आधारावर व जमिनीतील ओलावा पाहून शेतक-यांनी खरीपाच्या ९२ टक्के पेरण्या उरकल्या आहेत़ यावर्षी जिल्हयात सोयाबीनचा ४ लाख ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला असून यात ८८ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर तुर, ११ हजार ४२३ हजार हेक्टर क्षेत्रावर मुग, ९ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रावर उडीद, ४ हजार २३४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ८ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ४ हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर मका, १ हेक्टर ३९ क्षेत्रावर भुईमुंग, ८४ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावर तीळ आदी पिकांचा पेरा झाला आहे.
लातूर जिल्हयात खरीप हंगामात पेरणी झालेल्या सोयाबीन, मूग, तूर बियाणांचे नमुने कृषि विभागाने प्रयोग शाळेकडे बिज परिक्षणासाठी पाठवले होते़ यात मोठया प्रमाणात बियाणे अप्रमाणीत झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते़ आजूनही बºयाच कंपन्यांच्या बीज परिक्षणाचे आहवाल येणे बाकी आहे़ सध्या पेरणी झालेली पिके चांगल्या पावसामुळे बहरात आहेत़ या पिकांना किडीचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या किटकनाशकांची फवारणी करत आहेत़ लातूर जिल्हा परिषदेचा कृषि विभाग व जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयांना प्रत्येक तालुक्यातून १० ते १२ प्रमाणे खरीप हंगामात ११६ किटकनाशकांचे नमुने घेवून ते किटकनाशक चाचणी प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्याचे जुलै अखेर पर्यत उदिष्ठ आहे़ मात्र पर्यंत केवळ १२ नमुने घेण्यात आले असून ते सोमवारी पुणे येथे पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नमुने येण्यासाठी लागत आहेत चार महिने
सध्या कोरोनाचा कालावधी असल्याने लातूर जिल्हा परिषदेचा कृषि विभाग व जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयांनी घेतलेले नमुने पोस्टाने पुणे येथील किटकनाशक चाचणी प्रयोगशाळेकडे पाठवले जातात़ सदर तपासणीचा प्रमाणीत किंवा अप्रमाणीतचा आहवाल येण्यासाठी चार महिण्याचा कालावधी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यामुळे या खरीप हंगामात घेतलेले किटकनाशकांचे नमुन्यांच्या चाचणीचा आहवाल हंगाम संपल्या नंतर येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषि दुकानांचा कालावधी ठरतोय आडचण
लातूर जिल्हयात लॉकडाऊन असल्याने सकाळी ७ ते १२ या वेळेत कृषि विभागाचे दुकाने उघडी राहत असल्याने किटकनाशकांचे ग्रेडनुसार नमुने घेण्यास आडचणी येत आहेत़ तसेच पुणे येथे वाढत्या कोरोनाचा धोका पाहता तेथे जाण्यासाठी कर्मचा-यांच्या मनात भिती आहे.
Read More चाकूर ते अलगरवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे