30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरउदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

एकमत ऑनलाईन

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही संख्या वाढली असून त्यासाठी लागणा-या साहित्यांची अनेक दुकाने शहरात आहेत. त्यामुध्ये प्रमुख्याने बांधकामासाठी लागणारी वाळू ही तालुक्यातील वाढवणा परिसर व इतर तालुक्यातुन उदगीरला अवैधरित्या येत आहे. याबाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून वाळू माफिया शहरात वाळू घेऊन भरदिवसा व रात्री कुणालाही न जुमानता येत आहेत.

अवैध वाळूची वाहतूक करणा-या टिप्परला तालुक्यातील वाढवणा (बु.), उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जावे लागते मात्र एकदाही या वाळू माफियाला ना पोलीस प्रशासनाने अडवले ना तहसील विभागाने शासनाचा लाखो रुपायांचा महसूल बुडवून दररोज अनेक टिप्पर उदगीर शहरात दाखल होत असून याकडे प्रशासन जाणून – बुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा उदगीर शहरात चर्चीली जात आहे. एका वाळूच्या टिप्परसाठी ४० ते ४५ हजार रुपये मोजावे लागत आहेत ही रक्कम सर्वसामान्यांना परवडणारी नसून वाळूचा अवैध उपासा करुन दररोज लाखो रुपये उकळणारे वाळू माफियांकडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.

तहसीलदारांसमोर आव्हान
उदगीर शहरात अवैध वाळूचे अनेक टिप्पर दररोज येत आहेत. याकडे महसूल विभाग का डोळेझाक करीत आहे याबाबत संभ्रम असून शासनाचा लाखो रुपयांचा निधी बुडवून अवैध वाळू उपसा करणा-या व वाळू वाहतूक करणा-यावर महसूल विभाग कडक कार्यवाही करणार का? शहरात दररोज ये-जा करणा-या किती वाळू विक्रेत्यांनी चलन भरले?किंवा नाही भरल्यास संबंधिताला दंड लावण्यात आला आहे का हे पाहणे गरजेचे झाले आहे.

भांगेला औषध म्हणून मान्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या