34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeलातूरलातूरच्या डी.एन.जी.च्या ब्रँन्डची सांगलीकरांना भूरळ

लातूरच्या डी.एन.जी.च्या ब्रँन्डची सांगलीकरांना भूरळ

एकमत ऑनलाईन

लातूर : मिरा एंटरप्रायजेसच्यावतीने रोहिदास जयंतीचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या रिटेलर्स मीटच्या कार्यक्रमात एकाच छताखाली नामवंत ब्रँडच्या खरेदीचे विक्रेत्यांना रवी धामेजा यांनी संधी उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमाला ज्युनियर अमिताभ बच्चन व ज्युनियर जॉनी लिव्हर यांच्यासह माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, लेहर ग्रुपचे अनिल यादव, डी.एन.जी.चे दत्तात्रय गोरे, लिगोन ग्रुपचे सिकंदर कोठारे, पोलिस उपनिरिक्षक गणेश पाटील, मनिष ठाकूर, मनोहर कुरणे, अनिल अग्रवाल यांची उपस्थिती लक्षवेधी होती. एकाच छताखाली नामवंत ब्रँडच्या प्रदर्शनात इतर ब्रँडपेक्षा लातूरच्या डी.एन.जी.बॅ्रंडच्या पादत्रानाला विक्रेत्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांची ही भरारी इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

फुटवेअर कंपनी आणि विक्रेते यांच्यातील सलोखा कायम रहावा, एकमेकांतील व्यावसायीक दृष्टिकोण समोर यांवा, यासाठी मिरा एंटरप्रायजेस कंपनीचे मालक रवी धामेजा यांनी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे,लातूर येथील विक्रेत्यांना एकत्र आणत ज्युनियर अमिताभ बच्चन व ज्युनियर जॉनी लिव्हर यांच्या उपस्थितीत नामवंत बॅ्रंडचे प्रदर्शन व या निमित्ताने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ च्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही चांगल्या पध्दतीने पार पडला. हा मेळावा पादत्राने बनविणा-या कंपनीच्या मालकांसाठी विक्रेत्यांना भेटण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरली. या माध्यमातून एकाच ठिकाणी एवढया प्रकारच्या व्हरायटी व वेगवेगळया कंपन्याचे फुटवेअर पहिल्यांदाच एका ठिकाणी पाहण्याचा योग आल्यामुळे येणा-या ग्राहकांचाही आनंद द्विगुणीत झाला.

या प्रदर्शनामध्ये लातूरच्या डी.एन.जी.च्या बॅ्रंडलाही ग्राहकांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माजी मंत्री आमदार सुरेख खाडे, मिरा एंटरप्राजेसचे रवी धामेजा, अनिल यादव, ज्युनियर अमिताभ बच्चन, ज्युनियर जॉनी लिव्हर यांनी डी.एन.जी.चे संचालक दत्तात्रय गोरे यांचे कौतुक करून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गोेरेंचा आदर्श तरूणांसाठी प्रेरणादायी
लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात हालाखीच्या परिस्थितीतून वाटचाल करीत डी.एन.जी.या पादत्राणे उद्योगाची उभारणी उद्योजक दत्तात्रय गोरे यांनी केली. उद्योगाची सुरूवात असली तरी वस्तूमध्ये कॉलिटी दिल्यामुळे अत्यंत कमी कालावधीमध्ये डी.एन.जी. या उद्योगाने गगणभरारी घेतली. त्या कार्याची दखल महाराष्ट्र व कर्नाटकानेही घेतली असून तासगाव येथे ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये डी.एन.जी.च्या ब्रँडने ग्राहकाला भूरळ घातली. ज्या उद्योगाच्या माध्यमातून कॉलिटी व काँटीटी चांगली ठेवत ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षाही उपस्थित विके्रत्यांनी व्यक्­त केली. त्यामुळे त्यांच्या या शुन्यातून उभारलेल्या उद्योगाचा आदर्श इतर तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आणखी गडद, दिवसभरात ९८५५ नवे रुग्ण, चिंता वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या