23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरसमता नगरमध्ये संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिर

समता नगरमध्ये संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचे आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. गुरुवार दि. २६ मे रोजी बुध्द गार्डन, समता नगर, लातूर येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना
समाधान शिबीर संपन्न्­ा झाले. या शिबीरास पात्र लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये समाधान शिबीराच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून आदरांजली अर्पन करण्यात आली. यावेळी सरचिटणीस मोईज शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. दिपक सुळ, अ‍ॅड. समद पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी शिक्षण सभापती गोविंद सुरवसे, ऋषी पाटील, अकबर माडजे, विद्या पाटील, संजय निलेगावकर, इम्रान सय्यद, ख्वाजाबानू बु-हान, संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख, दगडू मिटकरी, राजू चिंताले, भालचंद्र सोनकांबळे, नरेश कुलकर्णी, अथरोददीन काझी, नायब तहसीलदार भिमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी झाडे, तलाठी डी. आर. शिंदे, महाइसेवा केंद्राचे कर्मचारी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, तहसीलचे कर्मचारी, निराधार महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.

या योजनेसाठी प्रभाग १६ मधील एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाधान शिबिरास ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. समाधान शिबिराच्या प्रसंगी राम गवळी, प्रविण कांबळे, प्रशांत कांबळे, बालाजी गवळी, बालाजी सोनटक्के, महारूद्र बिडवे, जीवन सुरवसे, अविनाश हाके, शितल मोरे, लक्ष्मीबाई भडोळे, संजू कांबळे, राम गवळी, सुरेश पालके, रोहन कांबळे यांच्यासह प्रभाग कार्यालय समन्वयक सुजीत देशपांडे उपस्थित होते. समाधान शिबीर यशस्वीपणे पार पडल्यामुळे लाभार्थीमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या